लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मुंबई येथील नायर हॉस्पिटलमध्ये जातीय छळातून डॉ. पायल तडवी यांनी आत्महत्या केली. यात तीन महिला डॉक्टरांंना अटक झाली असली तरी छळाबाबत डॉ. पायलने केलेल्या तक्रारीची दखल न घेणाºया रुग्णालयीन वरिष्ठांवरही कडक कारवाई करावी, अशी मागणी अनुसूचित जमाती कल्याण समितीचे प्रमुख आमदार डॉ. अशोक उईके यांनी केली आहे.आमदार डॉ. अशोक उईके यांच्या नेतृत्वाखालील अनुसूचित जमाती कल्याण समितीने गुरुवारी नायर हॉस्पिटलला भेट दिली. डॉ. उईके यांच्यासह समिती सदस्य आमदार डॉ. देवराव होळी, आमदार डॉ. संजय पुराम यांनी अधिष्ठातांकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली. यावेळी आमदार ऊईके यांनी हॉस्पिटलच्या कामकाजासंदर्भात तीव्र नापसंती व्यक्त केली. डॉ. पायल तडवी यांचा केवळ आदिवासी असल्यामुळे छळ करण्यात आला. याबाबत त्यांनी वरिष्ठांकडे वारंवार तक्रार करूनही न्याय मिळाला नाही. त्यामुळेच कंटाळून पायलने आत्महत्या केली. या संदर्भात आदिवासी समाजात तीव्र प्रक्रिया उमटत आहे. रुग्णालयातील सर्व संबंधितांनी पायलच्या प्रकरणात टाळाटाळ केली आहे. त्यामुळे चौकशी करून सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी समितीने केली. त्यानंतर मुख्यमंत्री व वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचीही भेट घेऊन हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची मागणी करण्यात आली.सर्व दोषींवर कारवाई होणारसमितीच्या बैठकीनंतर अधिष्ठातांनी या प्रकरणातील कारवाईचा अहवाल आमदार डॉ. अशोक उईके यांना सोपविला. त्यानुसार रुग्णालयाचे युनिट प्रमुख डॉ. चिंग लिंग यी, खाते प्रमुख डॉ. स्नेहा शिरोडकर यांच्यावर २३ मे रोजीच कारणेदाखवा नोटीस बजावण्यात आली. शिवाय पाच सदस्यीय समिती गठित करुन चौकशी सुरू करण्यात आली आहे. या समितीत अनुसूचित जमातीचा एक सदस्यही समाविष्ठ आहे. २५ मे रोजी अॅन्टी रॅगिंग समितीसमोर सर्व संबंधित प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे म्हणणे जाणून घेण्यात आले. डॉ. अंकिता खंडेलवाल, डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे यांच्यावर गुन्हा दाखल होताच २७ मेपासून त्यांना निलंबित करण्यात आले. आता डॉ. चिंग लिंग यी यांच्याही निलंबनाचे आदेश देण्यात आले आहे. पोलीस चौकशीअंती दोषी आढळणाºया सर्व कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले.
पायलची तक्रार टाळणाऱ्या वरिष्ठांवरही कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 9:12 PM
मुंबई येथील नायर हॉस्पिटलमध्ये जातीय छळातून डॉ. पायल तडवी यांनी आत्महत्या केली. यात तीन महिला डॉक्टरांंना अटक झाली असली तरी छळाबाबत डॉ. पायलने केलेल्या तक्रारीची दखल न घेणाºया रुग्णालयीन वरिष्ठांवरही कडक कारवाई करावी, अशी मागणी अनुसूचित जमाती कल्याण समितीचे प्रमुख आमदार डॉ. अशोक उईके यांनी केली आहे.
ठळक मुद्देआमदार अशोक उईके : अनुसूचित जमाती कल्याण समितीकडून मुंबईत आढावा