तेजापूर येथील दलित आदिवासी व इतर मागासवर्गीय शेतकरी मागील ३० वर्षांपासून अडेगाव येथील खंड क्र. २ वर अतिक्रमण करून शेती मशागत करत आहे. यातून उत्पन्न घेऊन आपल्या कुटुंबाची उपजीविका करीत आहे. जमिनीचा पट्टा मिळावा म्हणून किसान सभा सतत आंदोलन करीत आहे. तसेच तेजापूर येथील पट्टा मिळण्याकरिता त्यांचा दावा अर्ज संबंधित विभागास पाठविला आहे. त्यावर अजून कोणतीही कारवाई झाली नाही. सदर शेतकऱ्यांना जमिनीवरून बेदखल करण्याचा धोरणात्मक कोणताही निर्णय झालेला नाही. तसेच शेतकऱ्यांना पट्टा देण्यासाठी सरकार विचाराधीन आहे, असे असतांना शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बळजबरीने घुसून त्यांचे पीक चाेरून व पीक उपटून पिकांची नासधूस करण्याचा गावातील लोकांनी प्रयत्न केला आहे, ही निषेधार्थ बाब आहे. त्यामुळे यावर कारवाई करावी, अशी मागणी किसान सभेचे शंकर दानव, मनोज काळे, मंगेश पाचभाई, ॲड. दिलीप परचाके यांनी केली आहे.
पिकांची नासधूस करणाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 4:42 AM