लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून मंगळवारी जिल्ह्यातील संपूर्ण शाळा सुरू झाल्या. कुठे दिंडी काढून, कुठे स्वागत कमानी उभारून, ढोल वाजवून तर कुठे फुले वाटून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. मात्र, अर्ध्याअधिक स्वागतमूर्तीच्या अंगावर शालेय गणवेशच नाही, याकडे कुणाचेही लक्ष गेले नाही. ‘बालभारती’कडून आलेली मोफत पुस्तके वाटणारे पदाधिकारी, अधिकारी विद्यार्थ्यांच्या रंगीबेरंगी कपड्यांकडे पाहून न पाहिल्यासारखे करीत राहिले.शाळेचा पहिला दिवस ‘प्रवेशोत्सव’ म्हणून साजरा करण्याचे निर्देश होते. म्हणून बहुतांश शाळांमध्ये स्थानिक अधिकारी, पदाधिकारी पोहोचले. जिल्हा परिषद अध्यक्ष, शिक्षणाधिकाºयांनी यवतमाळ तालुक्यातील तिवसा येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव साजरा केला. या मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नवी कोरी पुस्तके वाटप करण्यात आली. मात्र, पुस्तके घेणाºया विद्यार्थ्यांच्या अंगावर मोफत मिळणारा शालेय गणवेश का नाही, याचा विचार कोणीही केला नाही. समग्र शिक्षा अभियानातून अद्यापही जिल्ह्याला गणवेशाचा निधी मिळालेला नाही, अशी सूत्रांची माहिती आहे.यवतमाळ नगर परिषद देणार सर्वांना गणवेशसमग्र शिक्षा अभियानातून फक्त मुली आणि अनुसूचित जाती, जमाती व बीपीएल प्रवर्गातील मुलांनाच गणवेश योजनेचा लाभ मिळतो. उर्वरित मुले वंचित राहतात. परंतु, यवतमाळ नगरपरिषदेच्या २० शाळांमधील अशा वंचित विद्यार्थ्यांनाही मोफत गणवेश देण्याचा निर्णय सोमवारी शिक्षण समितीच्या सभेत घेण्यात आला. विशेष म्हणजे, गणवेशासह सर्वच विद्यार्थ्यांना नोटबुक, पाचवी-आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मार्गदर्शिकाही मोफत देण्यात येणार आहे. नगराध्यक्ष कांचन चौधरी, शिक्षण सभापती निता केळापुरे, प्रशासन अधिकारी योगेश डाफ यांनी शिक्षण समितीत निर्णय घेतला असला, तरी स्थायी समितीच्या मंजुरीसाठी त्याची अमलबजावणी थांबलेली आहे.
आज पुस्तक घ्या.. गणवेश नंतर न्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 11:22 PM
सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून मंगळवारी जिल्ह्यातील संपूर्ण शाळा सुरू झाल्या. कुठे दिंडी काढून, कुठे स्वागत कमानी उभारून, ढोल वाजवून तर कुठे फुले वाटून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
ठळक मुद्देशाळेचा पहिला दिवस रंगबिरंगी : पुस्तक वाटणाऱ्या अधिकाºयांचे मात्र गणवेशावर दुर्लक्ष