शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
3
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
4
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
5
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
6
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
7
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
8
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
9
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
10
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
11
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
12
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
13
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
14
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
17
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
18
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
19
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
20
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 

आई-वडिलांचा सांभाळ निष्काम भावनेने करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 11:51 PM

केवळ समाजाला दाखविण्यासाठी आई-वडिलांची सेवा करू नका तर निष्काम भावनेने त्यांचा सांभाळ करा. त्यांच्या खऱ्या सेवेतूनच जगण्याची नवी दृष्टी प्राप्त होते, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले.

ठळक मुद्देतात्याराव लहाने : वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात नेत्रशस्त्रक्रिया शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केवळ समाजाला दाखविण्यासाठी आई-वडिलांची सेवा करू नका तर निष्काम भावनेने त्यांचा सांभाळ करा. त्यांच्या खऱ्या सेवेतूनच जगण्याची नवी दृष्टी प्राप्त होते, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले.अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या पुढाकारात दिग्रस-दारव्हा-नेर मतदारसंघातील रुग्णांसाठी येथील वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित नेत्रशस्त्रक्रिया शिबिराच्या अनौपचारिक उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, शिवसेनेचे जिल्हा परिषद गटनेते श्रीधर मोहोड यांच्यासह जे.जे. हॉस्पिटलच्या नेत्रतज्ज्ञ डॉ. रागिनी पारेख, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, नेत्रशास्त्र विभागाचे डॉ. सुधीर पेंडके आदी उपस्थित होते.वैद्यकीय महाविद्यालयात २४ डिसेंबरपर्यंत हे शिबिर चालणार आहे. दिग्रस-दारव्हा-नेर तालुक्यात नेत्रतपासणी शिबिरात निवड झालेल्या तब्बल एक हजार ५०० रुग्णांवर डॉ. तात्याराव लहाने व जे.जे. हॉस्पिटल मुंबई येथून आलेली ४० डॉक्टर्सची चमू नेत्र शस्त्रक्रिया करणार आहे. सर्व रुग्णांच्या नेत्र शस्त्रक्रिया आपण स्वत: करणार असल्याचे डॉ. लहाने यांनी यावेळी सांगितले.२२, २३ व २४ डिसेंबर रोजी सर्व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शस्त्रक्रियेकरिता आलेले रुग्ण व नातेवाईकांची निवास व भोजनाची व्यवस्था ना. संजय राठोड यांच्या मार्गदर्शनात माँ आरोग्य सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना ना. संजय राठोड यांच्याकडून मोफत चष्मे वितरित केले जाणार आहे. शिबिरासाठी हरिहर लिंगनवार, शिबिर संयोजक घनश्याम नगराळे, शेखर राठोड, विकास क्षीरसागर, अमित मेहरे, राजू गिरी आदी परिश्रम घेत आहेत.‘प्रतिसाद’ची माघारशिबिरासाठी मदतीचे आवाहन येथील प्रतिसाद फाऊंडेशनला वैद्यकीय महाविद्यालयातर्फे करण्यात आले होते. मात्र सदर शिबिर राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे समजताच फाऊंडेशनने सेवेतून माघार घेतली. तसे पत्र फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोज गुल्हाने यांनी अधिष्ठातांना दिले.