आर्णी : ई-पीक पाहणी प्रकल्पाची चुकीची अंमलबजावणी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावामुळे तलाठी अजय पस्तापुरे यांना १२ सप्टेंबरला जीव गमवावा लागला. या घटनेच्या निषेधार्थ विदर्भ पटवारी संघाने येथील तहसीलसमोर धरणे आंदोलन केले.
वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांच्या दबावामुळे तलाठी अजय पस्तापुरे यांना अपघाती जीव गमवावा लागला. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व पस्तापुरे यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली.
धरणे आंदोलनात बाळकृष्ण गाढवे, पवन बोंडे, विनोद अक्कलवार, रूपेश थोटगे, सी.डी. ठाकरे, आर.व्ही. वानखडे, श्याम मंडाळे, पी.एस. चव्हाण, एस.डी. सप्परवार, आर.ए. नागलकर, एस.आर. राठोड, ए.जे. नारनवरे, ए.डब्ल्यू. साबळे, पी.एस. राऊत, एस.जे. रणनवरे, ए.डी. पुरी, व्ही.व्ही. चौधरी, व्ही.एस. सोनुने, पी.आर. जाधव, आर.एस. चौधरी, एम.एम. उभाळे, व्ही.एस. शेंडे, एम.एम. पवार, पी.बी. गंधेवार, के.जी. खैरे, एस.एस. शेंडे, आर.एस. नेवारे, एस.के. फोडेकर, जे.ए. खोडे, बी.आर. कुथे, आर.आर. पायघन, पी. घोसे, पी.एम. राऊत, डी.एम. सकवान, डी.जी. नारनवरे, व्ही.ए. शेख, डी.डब्ल्यू. चव्हाण, वाय.आर. सावरकर, डी.पी. कुमरे, एम.पी. धकाते आदी सहभागी होते.