लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत तालुक्यातून प्रथम येण्याचा मान तपोनाला मिळाला असून खोपडी (बु.) दुसऱ्या, तर तोरनाळा गावाला तिसºया क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. रविवारी पुणे येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अभिनेते अमीर खान, जलसंपदामंत्री राम शिंदे आणि ‘चला हवा येऊ द्या’मधील कलावंतांच्या उपस्थितीत गावातील नागरिकांचा सन्मान करण्यात आला.दारव्हा तालुक्यात ८ एप्रिल ते २२ मे दरम्यान पाणी फाउंडेशनतर्फे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा घेण्यात आली. यात उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, तहसीलदार अरुण शेलार यांच्या मार्गदर्शनानंतर तालुक्यातील ५५ गावांनी सुरुवातीला सहभाग घेतला. या गावांतील ८४ महिला व १८२ पुरुष, असे एकूण २६६ जणांनी प्रशिक्षण पूर्ण केले. नंतर ७ एप्रिलला रात्री बाराच्या ठोक्याला वॉटर कप स्पर्धेला सुरुवात झाली.तालुक्यातील ५५ पैकी हातोला, हातगाव, लाखखिंड, रामगाव, मुंढळ, माळेगाव, भुलाई, भांडेगाव, बोधगव्हाण, पाळोदी, पाथ्रडदेवी, पांढुर्णा, तोरनाळा, तेलगव्हाण तपोना, गोरेगाव, खोपडी (बु.) कोलवाई, करजगाव, कुºहाड आदी २२ गावांचा या स्पर्धेत शेवटपर्यंत सहभाग होता. गावकºयांसह अनेक शहरी व ग्रामीण संघटनांनी दुष्काळमुक्ती, जलसंधारण, जलक्रांतीसोबतच गाव पाणीदार होण्यासाठी श्रमदान केले. स्पर्धेच्या शेवटपर्यंत एकूण सात लाख लक्ष ९४ हजार ७३३ घनमीटर काम झाले. आत्तापर्यंत तालुक्यात ५१९ मिमी पाऊस झाला. पाणी फाउंडेशनच्या कामांमध्ये तब्बल आठ दलघमी पाणीसाठा झाला आहे.
वॉटर कप स्पर्धेत तपोना अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 9:51 PM
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत तालुक्यातून प्रथम येण्याचा मान तपोनाला मिळाला असून खोपडी (बु.) दुसऱ्या, तर तोरनाळा गावाला तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. रविवारी पुणे येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अभिनेते अमीर खान, जलसंपदामंत्री राम शिंदे आणि ‘चला हवा येऊ द्या’मधील कलावंतांच्या उपस्थितीत गावातील नागरिकांचा सन्मान करण्यात आला.
ठळक मुद्देदारव्हा तालुका : खोपडीला दुसरा, तर तोरनाळाला तिसरा क्रमांक