शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
2
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
3
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
4
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
5
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 
6
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
7
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
8
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
9
धक्कादायक! गणवेश परिधान करून न आल्याने शिक्षकाकडून विद्यार्थ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण
10
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
11
रिया चक्रवर्ती हाजिर हो... ५०० कोटींच्या फसवणूक प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्रीला पोलिसांचे समन्स
12
भारताचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच पाकिस्तानात जाणार; बातमी ऐकून फारूख अब्दुल्ला खुश!
13
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
14
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
15
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
16
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
17
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
18
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
19
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
20
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच

१२ हजार कृषिपंपांना वीज पुरवठ्याचे टार्गेट

By admin | Published: January 11, 2017 12:36 AM

जिल्ह्यात सध्या कृषीपंपांसाठी ८८८३ अर्ज प्रलंबित आहे. तसेच पुढील तीन महिन्यात ३२७९ ग्राहक कृषीपंपासाठी अपेक्षित आहेत.

३१ मार्च डेडलाईन : ८८८३ प्रलंबित अर्ज, १५५ कोटींची गरज

यवतमाळ : जिल्ह्यात सध्या कृषीपंपांसाठी ८८८३ अर्ज प्रलंबित आहे. तसेच पुढील तीन महिन्यात ३२७९ ग्राहक कृषीपंपासाठी अपेक्षित आहेत. त्यामुळे येत्या ३१ मार्चपर्यंत १२ हजार १६२ कृषी वीज ग्राहकांना वीजजोडणी देण्याचे टारगेट जिल्हा महावितरणसमोर आहे. महावितरणला १२ हजार १६२ कृषी कनेक्शन देण्यासाठी एकूण १५५ कोटी ९४ लाख रुपयांच्या निधीची आवश्यक आहे. यापैकी सध्या जिल्हा महावितरणकडे शासनाने काही महिन्यांपूर्वी दिलेल्या विशेष पॅकेज व जिल्हा नियोजन समितीतून मिळालेल्या निधीमुळे ९६ कोटी एक लाख रुपये उपलब्ध आहे. यासाठी जिल्हा नियोजन विकास समिती (डिपीटीसी) मधून ६ कोटी १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला. या निधीतून ३२२ कृषी वीज कनेक्शन देता येईल. जिल्हा नियोजन समिती, पायाभूत आराखडा आणि विशेष पॅकेजचे मिळून ९६ कोटी एक लाख रुपये निधी महावितरणकडे उपलब्ध आहे. या एकूण निधीतून सहा हजार ५६५ कृषी वीज कनेक्शन देता येतील. यासाठी जिल्हा नियोजन समितीतून सहा कोटी दहा लाख रुपये मिळाले आहे. महावितरणच्या पायाभूत आराखड्याअंतर्गत दहा लाख रुपये शिल्लक आहेत आणि शासनाने विषेश पॅकेज अंतर्गत ८९ कोटी ८१ लाख रुपये दिले होते. त्यामुळे एकूण ९६ कोटी एक लाखांचा निधी सध्या महावितरणकडे उपलब्ध आहे. १२ हजार १६२ कृषी पंपांचे टारगेट पाहता यासाठी ५९ कोटी ९३ लाख रुपये कमी पडू शकतात. हा निधी न मिळाल्यास ५ हजार ५९७ कनेक्शन पेंडिग राहतील, परंतु पुढील तीन महिन्यात अपेक्षित लोकांनी अर्ज केले नाही तर यातून अर्ज कमी होऊ शकतील. कृषी पंपांसाठी ३० नोव्हेंबर २०१६ पर्यंत पैसे भरलेले प्रलंबित अर्ज ८८८३ आहेत. व अपेक्षित ग्राहक ३२७९ असे एकूण १२ हजार १६२ कृषी पंप कनेक्शन देण्याचे टारगेट आहे. यापैकी शासनाच्या विदर्भ विशेष पॅकेजमधून मिळालेल्या ८९ कोटी ८१ लाख रुपयांपैकी ७५ कोटी ७० लाख रुपयंचे टेंडर काढण्यात आले होते. उर्वरित चार ते साडेचार कोटी रुपयांसाठी टेंडर काढण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)