शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
आता नेतन्याहू फ्रान्सवर भडकले! लेबनॉनमध्ये फ्रेन्च कंपनीवर इस्रायची बॉम्बिंग, नेमकं काय घडलं?
3
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
4
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
5
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
6
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
7
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
8
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
9
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
10
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
11
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
13
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
14
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
15
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
16
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
17
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
18
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
19
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
20
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका

टीबी हॉस्पिटल व रस्ता हस्तांतरणावर नगराध्यक्षांचाच आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 9:55 PM

टीबी हॉस्पिटल आणि शहरातील रस्त्यांच्या हस्तांतरणावर अर्थसंकल्पीय बैठकीत खुद्द नगराध्यक्षांनीच आक्षेप नोंदविला. कुठल्याही ठरावाला मंजुरी देण्यापूर्वी नगराध्यक्ष आणि स्थायी समितीची मंजुरी घेणे आवश्यक असते.

ठळक मुद्देयवतमाळ नगरपरिषद : अर्थसंकल्पीय बैठकीत गदारोळ आणि वाद-विवाद

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : टीबी हॉस्पिटल आणि शहरातील रस्त्यांच्या हस्तांतरणावर अर्थसंकल्पीय बैठकीत खुद्द नगराध्यक्षांनीच आक्षेप नोंदविला. कुठल्याही ठरावाला मंजुरी देण्यापूर्वी नगराध्यक्ष आणि स्थायी समितीची मंजुरी घेणे आवश्यक असते. मात्र नगरपरिषद प्रशासनाने संपूर्ण नियम पायदळी तुडविल्याचे नगराध्यक्ष कांचनताई चौधरी यांनी या बैठकीत सांगितले. बुधवारी झालेली अर्थसंकल्पीय बैठक आक्षेप, गदारोळ आणि वाद-विवादाच पार पडली.नगरपरिषदेने १८३ कोटींचे अंदाजपत्रक बुधवारी झालेल्या अर्थसंकल्पीय बैठकीत सादर केले. हे अंदाजपत्रक सभागृहात येताच नगराध्यक्षांसह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी त्यावर आक्षेप नोंदविले. तर काही नगरसेवकांनी सादर अंदाजपत्रक समजत नसल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. यामुळे अर्थसंकल्पीय बैठकीत आणखी गोंधळ वाढला. कुठल्याही ठरावाला मंजुरी देण्यापूर्वी नगराध्यक्ष आणि स्थायी समितीची मंजुरी घेणे आवश्यक असते. परंतु येथे सर्वनियम पायदळी तुडविण्यात आले. टीबी हॉस्पिटलसाठी नऊ कोटी रुपये परस्पर वळते करण्यात आले. त्यामुळे विकास कामांना खीळ बसली असल्याचा आक्षेप नगराध्यक्ष कांचनताई चौधरी यांनी नोंदविला. हा निधी परत देण्यात यावा आणि टीबी हॉस्पिटलची जागा मोफत मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावा, असे त्या म्हणाल्या. यासोबतच शहरातून जाणारे राज्य मार्ग नगरपरिषदेने हस्तांतरित करून घेतले. शहरातील रस्ते दुरुस्त करण्यासाठी पैसा नसताना राज्य मार्गाची दुरुस्ती नगरपरिषदेला करता येणे अशक्य आहे. कुणालाही विश्वासात न घेता परस्पर याबाबत ठराव पारित करण्यात आला, असा आक्षेप या बैठकीत नगराध्यक्षांनी नोंदविला. त्यांच्या या आक्षेपावर भाजपाचे पदाधिकारी चांगलेच संतापले. त्यांनी आपल्या स्वाक्षरीनेच आजची सभा बोलाविली आहे. स्थायी समितीच्या बैठकीतच या ठरावाला मंजुरी मिळाली आहे. यामुळे अर्थसंकल्पीय मंजुरी एक औपचारिकता आहे. आता आक्षेपाला कुठलाही अर्थ नाही, असे नियोजन सभापती प्रवीण प्रजापती यांनी सभागृहात सांगितले.यावेळी सत्ताधारी बाकावरील नगरसेविका आणि विरोधी बाकावरील नगरसेविका अर्थसंकल्पाच्या प्रती आम्हाला काही तासापूर्वी सोपविण्यात आल्या. अर्थसंकल्प आम्हाला कळला नाही. सोप्या भाषेत समजावून सांगा, असे म्हणाल्या. त्यावरून आणखीनच गोंधळ निर्माण झाला. नगरसेवक नितीन गिरी यांनी पाण्याचा प्रश्न उपस्थित केला. पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी केली. यावेळी नगराध्यक्षांनी या विषयावर स्वतंत्र बैठक बोलाविली जाणार असल्याचे सांगितले. सभा सुरू असताना काही महिला पाण्याचा विषय घेऊन सभागृहात धडकल्या. प्राधिकरणाचे पाणी सोडण्याच्या वेळेला मोटारपंप लावले जाते. त्यामुळे पाणी मिळत नाही. पाणी सोडताना वीज प्रवाह खंडित करावा, अशी विनंती या महिलांनी नगराध्यक्ष कांचनताई चौधरी यांच्याकडे केली.जागा हस्तांतरणच नाही तर निविदा कशा ?बुधवारच्या अर्थसंकल्पीय बैठकीत नियोजन सभापती प्रवीण प्रजापती यांनी टीबी हॉस्पिटल जागेच्या निविदा तत्काळ काढण्याची आवश्यकता असल्याचे मत नोंदविले. यावेळी विरोधी बाकावरील सदस्यांनी जागा हस्तांतरण होण्यापूर्वीच निविदा काढता येतात काय अशी कोपरखळी मारली. ९० कोटींचा हिशेब कसा काय देता आहात असा प्रश्न केला.चार महिन्यात चार कोटी कसे ?अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात ठेवीवरील व्याजाचे आठ महिन्यात १४ लाख नगरपरिषदेला मिळतील, असे म्हटले आहे. तर चार महिन्यात चार कोटींचा उल्लेख आहे. यावर सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी प्रशासनातील अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले. आपले गणित विश्लेषण करून सांगण्याची विनंती केली. अधिकाºयांना उत्तरच देता आले नाही.