लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ५ सप्टेंबरला सर्वत्र शिक्षक दिन साजरा होत आहे. मात्र जिल्ह्यातील शिक्षकांवर शिक्षक दिनीही ‘दीन’च राहण्याची वेळ ओढवली आहे. जिल्हा परिषदेने त्यांना वेतनच न दिल्याने त्यांच्यावर ही दीनपणाची वेळ ओढवली आहे.दर महिन्याला किमान ५ तारखेपर्यंत वेतन अदा केले जाईल, अशी ग्वाही जिल्हा परिषद प्रशासनाने दिली होती. एवढेच नव्हे, तर दरमहा १ तारखेलाच सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांच्या खात्यात जमा करण्याची हमी दिली होती. मात्र आजपर्यंत कधीही १ किंवा ५ तारखेला वेतन खात्यात जमा झालेच नाही, असे कर्मचारी व शिक्षक सांगतात. ही बाब खरीसुद्धा आहे. मात्र किमान शिक्षक दिनाच्या महिन्यात तरी ५ तारखेच्या आत वेतन मिळेल, अशी शिक्षकांना अपेक्षा होती. तीसुद्धा फोल ठरली आहे.जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे वेतन अद्याप बँकेत जमा झाले नाही. अशा स्थितीत उद्या ५ सप्टेंबरला धुमधडाक्यात शिक्षक दिन साजरा केला जात आहे. जिल्हा परिषद काही शिक्षकांचा सत्कारही करणार आहे. मात्र हा कोरडा सत्कार असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. किमान या महिन्यात तरी ५ तारखेच्या आत वेतन मिळायला हवे होते, असे मत अनेकांनी व्यक्त केले.पोळ्यापर्यंत वेतन नाहीचअद्याप वंटनच नसल्याने किमान पोळ्यापर्यंत शिक्षकांचे वेतन होणे कठीण दिसते. जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे (२३५) अध्यक्ष राजुदास जाधव यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. किमान शिक्षक दिनाच्या महिन्यात ५ तारखेपर्यंत वेतन मिळण्याची अपेक्षा असताना ती फोल ठरल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आजपर्यंत कधीही १ तारखेला वेतन मिळाले नसल्याचे स्पष्ट केले.
शिक्षक दिनीही शिक्षक राहणार ‘दीन’च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 10:25 PM
५ सप्टेंबरला सर्वत्र शिक्षक दिन साजरा होत आहे. मात्र जिल्ह्यातील शिक्षकांवर शिक्षक दिनीही ‘दीन’च राहण्याची वेळ ओढवली आहे. जिल्हा परिषदेने त्यांना वेतनच न दिल्याने त्यांच्यावर ही दीनपणाची वेळ ओढवली आहे.
ठळक मुद्देवेतन नाही : जिल्हा परिषदेचा कारभार, विविध समस्या प्रलंबित