यवतमाळ : शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी जिल्हा परिषदेसमोर बैठा सत्याग्रह करण्यात आला. मागण्या मान्य न झाल्यास शिक्षक दिनी ५ सप्टेंबर रोजी शिक्षण हक्क आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजूदास जाधव यांनी दिला. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघातर्फे शिक्षक कल्याण निधीसह विविध १५ मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. जुनी पेन्शन योजना सुरू करा, शिक्षक कल्याण निधीची रक्कम तत्काळ मुदत ठेवीत बँकेत जमा करावी, मुख्याध्यापकाकडील आॅनलाईन कामे काढून घ्यावी, शिक्षकांचे पगार एक तारखेला द्यावे, कपात आठ दिवसात वित्तीय संस्थांना पाठवावी, विषय शिक्षकांची ज्येष्ठता यादी आॅनलाईन प्रसिद्ध करावी, चटोपाध्याय निवडश्रेणी प्रकरणे निकाली काढावी, एकस्तर वेतनश्रेणी व घरभाडे भत्ता देण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजूदास जाधव, सरचिटणीस विनोद गोडे, गौतम कांबळे, शेख जलील, शरद इंगळे, आनंद कुंबरकर, अशोक तांदळे, संजय ढोले, शत्रुघ्न चव्हाण, प्रवीण राठोड, शेख लुकमान, संजय इंगोले, भानूदास राऊत, अजय अक्कलवार, सचिन गिराम, दीपक चौधरी, दीपक दोडके, राजेंद्र पिंपळशेंडे, संजय आगुलवार, चित्तरंजन कडू, सुदर्शन चव्हाण, बबनराव मुंडवाईक, विजय डंभारे, काशिनाथ आडे, गणेश कदम, विजय मिरासे, साहेबराव राठोड, सुनिल राठोड, नदीम पटेल, मदन पराते, शरद घारोड, जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे राजेंद्र कठाळे, आरोग्य संघटनेचे अनिल जयसिंगपुरे, रवी आडे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
शिक्षक दिनी शिक्षण हक्क आंदोलन
By admin | Published: August 23, 2016 2:11 AM