लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाचा पाया रोवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ३ जानेवारीला महिला मुक्ती दिन, बालिका दिन म्हणून सर्वत्र साजरी होते. यंदा जिल्ह्यातील शिक्षिकांना या दिवसानिमित्त विशेष पगारी रजा मंजूर करण्यात आली आहे. मात्र ही रजा शिक्षिकांना स्त्री शिक्षण विषयक कार्यशाळेत हजर राहून सत्कारणी लावावी लागणार आहे.जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ यांच्या पुढाकाराने शुक्रवारी येथील सहकार भवनात सकाळी ११ वाजता शिक्षिकांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे अनुभव शिक्षिकांना ऐकविले जाणार आहे. तर कर्तृत्ववान महिला तसेच बालिकांचा यावेळी सत्कार केला जाणार आहे.कार्यशाळेतील मार्गदर्शनाचा जिल्ह्यातील सर्व शिक्षिकांना लाभ घेता यावा, यासाठी जिल्हा परिषदेने सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना बुधवारी तातडीचे पत्र रवाना केले. या पत्रानुसार प्रत्येक पंचायत समितीमधील सर्व शिक्षिकांना कार्यशाळेला उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. कार्यशाळेच्या निमित्ताने शिक्षिकांना पगारी रजा मंजूर झाली आहे. विशेष म्हणजे, या दिवसाचा कालावधी कर्तव्य कालावधी समजण्यात येणार आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाभरातील शिक्षिकांना पगारी रजा मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र किती शिक्षिका कार्यशाळेला हजर राहिल्या याची नोंद घेऊन जिल्हा परिषद अहवाल तयार करणार आहे. कार्यशाळेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.कर्तृत्ववान महिलांचा सत्कारजिल्हा परिषदेतर्फे आयोजित बालिका दिन व महिला मेळाव्यात जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार केला जाणार आहे. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरीताई आडे, सीईओ जलज शर्मा, उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर, बांधकाम सभापती गजानन बेजंकीवार, शिक्षण सभापती कालिंदा पवार, महिला बालकल्याण सभापती अरुणाताई खंडाळकर, समाज कल्याण सभापती प्रज्ञाताई भुमकाळे, शिक्षणाधिकारी दीपक चवने, शिक्षण समितीचे निमंत्रित सदस्य मधुकर काठोळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
महिला मुक्तीदिनासाठी शिक्षिकांना पगारी रजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 5:00 AM
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ यांच्या पुढाकाराने शुक्रवारी येथील सहकार भवनात सकाळी ११ वाजता शिक्षिकांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे अनुभव शिक्षिकांना ऐकविले जाणार आहे. तर कर्तृत्ववान महिला तसेच बालिकांचा यावेळी सत्कार केला जाणार आहे.
ठळक मुद्देजिल्हा परिषद : सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विशेष कार्यशाळा