शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

शिक्षकांच्या वेतनाचे पुन्हा त्रांगडे

By admin | Published: March 20, 2016 2:21 AM

महिन्याच्या एक तारखेलाच शिक्षकांच्या खात्यात पगार जमा करण्याचा शासन निर्णय असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

डिसेंबरपासून प्रतीक्षा : दोन हजार खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षक वंचितयवतमाळ : महिन्याच्या एक तारखेलाच शिक्षकांच्या खात्यात पगार जमा करण्याचा शासन निर्णय असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळेतील दोन हजार शिक्षकांना तर चक्क गेल्या तीन महिन्यांपासून वेतन देण्यात आलेले नाही. त्यामुळे होळीचा सण उधारीवर करण्याची वेळ आली आहे.जिल्ह्यात खासगी प्राथमिक शाळांची संख्या मोठी आहे. प्लॅन आणि नॉनप्लॅन अशा वर्गवारीत मोडणाऱ्या या शाळांमध्ये दोन हजार शिक्षक सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षणाचे धडे देत आहेत. त्यातील २०० शिक्षक एकट्या पुसद तालुक्यात आहेत. तर उर्वरित १८०० शिक्षक इतर तालुक्यांमध्ये कार्यरत आहेत. सन २००८ मध्ये ज्यांना अनुदान सुरू झाले, अशा १६४ खासगी प्राथमिक शाळा (प्लॅन) जिल्ह्यात आहेत. परंतु, येथील शिक्षकांना डिसेंबर २०१५, जानेवारी, फेब्रुवारी २०१६ या तीन महिन्यांचे वेतन अद्यापही मिळालेले नाही. खासगी प्राथमिक शाळेतील दोन हजार शिक्षकांना नियमित आॅनलाईन वेतन मिळावे यासाठी स्पेशल पे युनिट (वेतन पथक) निर्माण करण्यात आले आहे. मात्र, या पथकातील कर्मचारी शिक्षकांच्या वेतनासाठी आवश्यक माहिती पुण्याच्या संचालनालयाकडे वेळेत पाठवित नाही. त्यामुळे तेथून जिल्ह्याकडे वंटन पाठविले जात नाही, असा आरोप शिक्षकांकडून होत आहे. या संदर्भात शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्यांसह शिक्षण सभापतींना व्यथा सांगूनही उपयोग झालेला नाही, हे विशेष. (स्थानिक प्रतिनिधी)खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे वेतन नियमित व्हावे यासाठी शिक्षण सभापती नरेंद्र ठाकरे यांना निवेदन दिले आहे. खासगी व जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांच्या वेतनाबाबत अशीच चालढकल सुरू राहिल्यास नाईलाजाने इब्टा संघटनेमार्फत उपोषण करण्यात येईल.- दिवाकर राऊत, जिल्हाध्यक्ष, इब्टा संघटनाजिल्हा परिषदेचे आठ हजार शिक्षकही प्रतीक्षेतजिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील आठ हजार शिक्षकही फेब्रुवारीच्या वेतनाची प्रतीक्षा करीत आहेत. अर्धा मार्च उलटल्यावरही फेब्रुवारीचा पगार मिळालेला नाही. त्यामुळे शिक्षण विभागावर रोष व्यक्त केला जात आहे. एक तारखेला पगार देण्याचा आदेश फोल ठरल्याची भावना शिक्षकांमध्ये निर्माण झालेली आहे.