यवतमाळ : पगारदार खातेधारकांना राष्ट्रीयीकृत बँकेच्या धर्तीवर सॅलरी पॅकेजअंतर्गत विमा व इतरही लाभ देण्याबाबत प्राथमिक शिक्षकांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनियुक्त अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे निवेदन दिले.
प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्या आहेत. बँकेसंदर्भतील समस्या सोडविण्यासाठी जिल्हा बँक कटिबद्ध असल्याची ग्वाही प्रा. कोंगरे यांनी दिली. प्रा. टिकाराम कोंगरे यांच्याकडे जिल्हा परिषदेत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या वेतनासंदर्भातील जिल्हा मध्यवर्ती बँकेत विविध सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
राष्ट्रीयीकृत बँकेच्या धर्तीवर सॅलरी पॅकेजअंतर्गत विमासह इतर सर्व लाभ जिल्ह्यातील सर्व खातेधारकांना मिळावा, यासह इतरही महत्त्वाच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या वेळी अध्यक्षांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सर्व मागण्या सोडविण्यासाठी तत्परतेने कारवाई करेल, अशी ग्वाही दिली. या वेळी प्रथम जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रा. टिकाराम कोंगरे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी देवेंद्र बच्चेवार, संजय साखरकर, आनंदकुमार शेंडे, महेश सूत्रावे, अजय महाजन, विनय जनपदकर, भारत गारघाटे आदी उपस्थित होते.