लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील विविध शिक्षण संस्थांच्या शाळांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन झाले. मात्र, त्यातील बहुतांश शिक्षकांना समायोजित शाळेत रूजूच करून घेण्यात आले नाही. आता त्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर झाला असून या शिक्षकांनी गुरुवारी शिक्षणाधिकारी कार्यालयात ठिय्या दिला.२०१६-१७ या शैक्षणिक सत्रात जिल्ह्यात ५० शिक्षक अतिरिक्त ठरले. त्यातील ४४ जणांचे विविध शिक्षण संस्थांच्या शाळांमध्ये समायोजन करण्यात आले. तर ६ शिक्षकांच्या जागाच नसल्याने त्यांना विभागस्तरावरील समायोजनासाठी पाठविण्यात आले. परंतु, ४४ जणांपैकी आतापर्यंत केवळ १२ शिक्षक नव्या शाळेत रूजू होऊ शकले. तर उर्वरित ३२ अतिरिक्त शिक्षक अद्यापही कोणत्याच शाळेत रूजू झालेले नाहीत. त्यामुळे त्यांचे वेतन अडलेले आहे. दररोज शिक्षणाधिकारी कार्यालयात चकरा मारूनही प्रश्न न सुटल्यामुळे गुरुवारी या शिक्षकांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात ठिय्या दिला.यावेळी शिक्षण संघर्ष समितीच्या अध्यक्ष संगीता शिंदे आणि विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष अरविंद देशमुख अशा दोन संघटनांच्या नेत्यांनी हा प्रश्न रेटला.अतिरिक्त शिक्षकांचे वेतन निघालेच पाहिजे, असे नारे यावेळी लावण्यात आले. शिक्षणाधिकारी उपलब्ध नसल्याने शिक्षकांनी शिक्षणाधिकाºयांच्या कक्षातच ठिय्या दिला. यावेळी शिक्षण संघर्ष समितीच्या संगीता शिंदे, विमाशीचे अरविंद देशमुख यांच्यासह रामकृष्ण जिवतोडे, मनोज जिरापुरे, निलिमा काळमेघ आदी उपस्थित होते.अखेर काढले पत्रवेतनाच्या मागणीसाठी शिक्षण संघर्ष समिती आणि विमाशीच्या पदाधिकाºयांनी थेट शिक्षणाधिकाºयांच्या कक्षात ठिय्या दिला. वेतनाचा प्रश्न निकाली निघत नाही तोवर इथून हटणारच नाही, अशी भूमिका शिक्षण संघर्ष समितीच्या अध्यक्ष संगीता शिंदे यांनी घेतली. त्यानंतर शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी लगेच पत्र जारी करून अतिरिक्त शिक्षकांचे नोव्हेंबरचे वेतन जुन्याच शाळेतून काढण्याचे आदेश दिले. तर आॅक्टोबरची देयकेही वेतन पथक अधीक्षकांकडे सादर करण्याचे आदेश दिले.
शिक्षकांचा ईओ कार्यालयात ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 11:23 PM
जिल्ह्यातील विविध शिक्षण संस्थांच्या शाळांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन झाले. मात्र, त्यातील बहुतांश शिक्षकांना समायोजित शाळेत रूजूच करून घेण्यात आले नाही.
ठळक मुद्देवेतन अडले : समायोजनानंतर केवळ १२ शिक्षक होऊ शकले रूजू