शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

नागपूर-तुळजापूर चौपदरी महामार्गासाठी १६ हजारांवर सागवान वृक्ष तोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 12:11 PM

नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी ८० हजार किलोमीटर लांबीच्या क्षेत्रातील तब्बल १६ हजार सागवान वृक्ष अंतिम परवानगीशिवाय कापली गेल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्दे अंतिम परवानगी नाही, तरीही यवतमाळ वनविभाग गप्प !

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी ८० हजार किलोमीटर लांबीच्या क्षेत्रातील तब्बल १६ हजार सागवान वृक्ष अंतिम परवानगीशिवाय कापली गेल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या वृक्षांची किंमत २० कोटींपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जाते.नागपूर-बोरी-तुळजापूर या राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला असून संपूर्ण मार्ग चौपदरी केला जात आहे. मध्यप्रदेशातील राजकीय वरदहस्त असलेल्या एका कंपनीला हा कंत्राट मिळाला आहे. या मार्गासाठी मोठ्या प्रमाणात भूसंपादन केले गेले. या मार्गाची रुंदी पूर्वी ६० फूट अर्थात १८ मीटर एवढी होती. परंतु ती आता दोन्ही बाजूला ११-११ मीटर वाढवून थेट ४० मीटर एवढी करण्यात आली. त्यामुळे दोन्ही बाजूला ११ मीटर क्षेत्रातील सागवान वृक्षे या महामार्गात अडसर ठरत होती. ती केवळ पहिल्या टप्प्याची परवानगी घेऊन कापण्यात आली. अंतिम परवानगी नसताना सुमारे २० कोटींची वृक्षे कापण्यात आली. अंतिम परवान्यासाठी किमान १९ अटींची पूर्तता करावी लागते. प्रत्यक्षात वन विभागाच्या रेकॉर्डवर केवळ ४६ लाखांच्या वृक्षाचीच कटाई दाखविली गेली. वृक्ष कटाई व वाहतुकीचे हे कामही दुसऱ्या-तिसऱ्या कंत्राटदाराकडेच वळते झाले.यवतमाळ ते महागाव या सुमारे ८० किलोमीटर लांबीच्या क्षेत्रातील (३२० ते ४०० किलोमीटर अंतरातील) वृक्षतोडीचे कंत्राट एका व्यक्तीला देण्यात आला आहे. त्यांनी तो ‘गुप्त’पणे तिसºया व्यक्तीकडून अंमलबजावणी करून घेतल्याचे सांगितले जाते. यवतमाळ जिल्ह्यात चहूबाजूने सागाचे घनदाट जंगल आहे. प्रत्येक किलोमीटरमध्ये किमान १०० परिपक्व सागवान वृक्ष आहेत.

डीएफओ-सीसीएफ मूग गिळूनएवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊनही वनखात्यातून मात्र कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. वॉचमनपासूनचा अनुभव असलेले आर्णीचे वनपरिक्षेत्र अधिकारी, अद्याप परिविक्षाधीन कार्यकाळही पूर्ण न केलेले सहायक वनसंरक्षक, यवतमाळचे उपवनसंरक्षक व यवतमाळचे मुख्य वनसंरक्षक राऊळकर ही सर्वच मंडळी या वृक्षतोडीबाबत गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कंत्राटदाराच्या राजकीय वजनामुळे तर वन खात्याचे हे अधिकारी या वृक्षतोडीकडे दुर्लक्ष करीत नाही ना, अशी शंका व्यक्त होत आहे.

टॅग्स :highwayमहामार्ग