घाटंजी तांड्याचे नायक नामदेव आडे यांच्या निवासस्थानी २२ ऑगस्टला तीज पेरण्यात आली. नऊ दिवस मुलींनी नाचत, गात त्या तिजवर पाणी टाकून त्याचे पूजन केले. सोमवारी सायंकाळी संत सेवालाल मंदिर येथे श्रीकृष्ण मूर्तीची स्थापना करण्यात आली. श्रीकृष्ण जन्माष्टमी पूजनानंतर मंगळवार दुपारी तीज तोडण्याकरिता सर्व मंदिरांत गोळा झाले.
तांड्यातील निवृत्त ज्येष्ठ नागरिक जेबसिंग राठोड, मीनाक्षी ब्रह्मानंद चव्हाण, शाम राठोड, गोवर्धन आडे यांचा यावेळी शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. नायक नामदेव आडे, कारभारी अरविंद जाधव, डाव बंडू जाधव, मंदिर निर्माण समिती अध्यक्ष कैलाश राठोड, नेहरू महाराज, सीताराम राठोड, मोहन राठोड, केवलसिंग जाधव, रामधन राठोड, डॉ. देविदास राठोड, ॲड. मनोज राठोड, अनिल जाधव यांचाही सत्कार करण्यात आला. नंतर मूर्तीचे पूजन तीज पूजन व आरती करून वाघाडी नदीच्या पात्रात विसर्जन करण्यात आले. पी. एस. राठोड यांनी संचालन, संजय आडे यांनी प्रास्ताविक, तर बाबूसिंग राठोड यांनी आभार मानले. प्रा. रवी आडे, संदीप जाधव, बाळकृष्ण आडे, निखिल जाधव, रोशन जाधव, विजय चव्हाण, संदीप चव्हाण, रमेश जाधव, आदींनी परिश्रम घेतले.