लोकमत न्यूज नेटवर्कनेर : ग्रामीण भागात कृषी उत्पादनावर प्रक्रियाच होत नाही. व्यापारी त्याचा गैरफायदा घेतात. यावर मात करण्यासाठी नेरचा तेजस्विनी प्रकल्प सरसावला आहे. तूर लागवड ते खरेदीपर्यंतचे काम करणाऱ्या या प्रकल्पामुळे ४८ गावांतील महिलांच्या कामांना उभारी मिळाली आहे.नेर तालुक्यातील तेजस्विनी प्रकल्पाने राज्यापुढे एक ओळख निर्माण केली आहे. पै-पै गोळा करणाºया या महिलांनी बचतगट स्थापन केला. या बचतगटाचे २०१६ मध्ये लोकसंचालित साधन केंद्र सुरू करण्यात आले. नेर तालुक्यातील साडेतीन हजार महिला या गटाशी जुळल्या आहेत. त्या दरमहा साडेतीन लाख रुपयांची बचत करीत आहेत. बचतीच्या अंतर्गत कर्जाच्या माध्यमातून वितरण करण्यात येते. त्यावर केवळ दीड टक्काच व्याज आकारले जाते. व्याजाची रक्कम बचत खात्यात गोळा होते. हे व्याज महिला वाटून घेतात. यामुळे पूर्वी सावकाराकडे हात पसरणाºया महिलांना आता बचतगटातूनच कर्ज मिळते. २०१७ मध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा अध्यक्ष डॉ. रंजन वानखडे यांच्या मार्गदर्शनात तूरडाळ प्रकल्प साकारण्यात आला. प्रकल्पात अॅटोमायझेशन मशिन बसविण्यात आली. यामुळे तुरडाळीला आकर्षक पॅकींग शक्य झाले. येथील तूरडाळीला अॅमेझॉननेही मागणी नोंदविली आहे. हा प्रकल्प साकारल्यामुळे ४८ गावांतील शेतकऱ्यांना थेट फायदा झाला आहे. लोकसंचालित केंद्राच्या कृषीसेवा केंद्रातूनच ते बियाणे खरेदी करतात आणि हंगाम संपल्यानंतर याच महिलांकडून तुरीची खरेदी करण्यात येते. त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हमीदर गावातच मिळतो.असे आहे व्यवस्थापन मंडळया केंद्रातील व्यवस्थापन मंडळाच्या अध्यक्ष म्हणून पुष्पा गेडाम तर सचिव म्हणून सुनिता संतोष गडपायले काम पाहत आहेत. उपजीविका समन्वयक म्हणून भारती रणदिवे तर सहयोगिनी म्हणून माया मेश्राम, मिना वानखडे, रेखा वंजारी, जयमाला खडसे, अंजू रंगारी काम पाहत आहेत.
तूर लागवड ते खरेदीचा ‘तेजस्विनी’ प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 9:25 PM
ग्रामीण भागात कृषी उत्पादनावर प्रक्रियाच होत नाही. व्यापारी त्याचा गैरफायदा घेतात. यावर मात करण्यासाठी नेरचा तेजस्विनी प्रकल्प सरसावला आहे. तूर लागवड ते खरेदीपर्यंतचे काम करणाऱ्या या प्रकल्पामुळे ४८ गावांतील महिलांच्या कामांना उभारी मिळाली आहे.
ठळक मुद्देनेरच्या महिलांचा उपक्रम : ४८ गावांना मिळाली उभारी, थेट मार्केटिंगने फायदा