शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

सांगा, टीचभर खोलीत कसे काढणार २४ तास?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 6:00 AM

यवतमाळ शहरात गेल्या आठवडाभरापासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधानांच्या निर्देशानुसार संपूर्ण देशच लॉकडाऊन झाला आहे. संचारबंदीची कठोर अंमलबजावणी सुरू आहे. व्यापारी, शासकीय कर्मचारी, खासगी आस्थापनांचे चाकरमाने आदेशाचे पालन करीत सुट्या घेऊन घरी आहे. कुणाचे घर टोलजंग नसले तरी किमान चार लोकांचा निर्वाह होऊ शकेल इतके सुटसुटीत आहे. मात्र स्लम वस्त्यांमध्ये अशी परिस्थिती नाही.

ठळक मुद्देमागास वस्त्यांमध्ये संचारबंदीचा फज्जा : अर्धा संसार रस्त्यावर, बेरोजगार तरुणांची घुसमट

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाचा संसर्ग पसरु नये म्हणून देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. प्रत्येक नागरिकाने घरातच बसावे असे सक्त निर्देश आहे. मात्र ही संचारबंदी तंतोतंत पाळणे गोरगरिबांच्या वस्त्यांना जड जात आहे. यवतमाळातील अनेक स्लम वस्त्यांमध्ये नागरिकांना नाईलाजाने काही तास तरी घराबाहेर निघावेच लागत आहे. बाहेर कोरोनाची धास्ती, सोबतच पोलिसांच्या दंडुक्याची भीती तर घरात आश्रयासाठी अपुरी जागा या परिस्थितीमुळे हजारो नागरिकांच्या मनाचे द्वंद्व सुरू आहे.यवतमाळ शहरात गेल्या आठवडाभरापासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधानांच्या निर्देशानुसार संपूर्ण देशच लॉकडाऊन झाला आहे. संचारबंदीची कठोर अंमलबजावणी सुरू आहे. व्यापारी, शासकीय कर्मचारी, खासगी आस्थापनांचे चाकरमाने आदेशाचे पालन करीत सुट्या घेऊन घरी आहे. कुणाचे घर टोलजंग नसले तरी किमान चार लोकांचा निर्वाह होऊ शकेल इतके सुटसुटीत आहे. मात्र स्लम वस्त्यांमध्ये अशी परिस्थिती नाही.प्रामुख्याने यवतमाळातील गवळीपुरा, पाटीपुरा, नेताजीनगर, उमरसरा परिसर, इंदिरानगर, अंबिकानगर, अशोकनगर, पॉवर हाऊस परिसर, धोबी घाट, कुंभारपुरा, पिंपळगाव परिसर, वाघापूर टेकडी परिसर, लोहारा, तारपुरा, भोसा आदी परिसरातील अनेक वस्त्या अत्यंत कोंदट आहेत. रस्ते म्हणजे चिंचोळ्या आणि अरुंद बोळीच आहेत. या गल्लीबोळांच्या काठावर एकमेकांना चिकटलेली घरे आणि त्यात दाटीवाटीने राहणारी कष्टकऱ्यांची कुटुंबे सामान्य परिस्थितीतही मोकळा श्वास घेण्यासाठी तडफडत असतात. आता तर संचारबंदीने घराचे दार लावून आत बसण्याची वेळ आली आहे. दिवसभर मिळेल ते काम करणे आणि रात्री कसाबसा खोलीत आसरा घेणे, हे जीवनचक्र सध्या अवरुद्ध झाले आहे. अडखळले आहे. बाहेर निघण्याची परवानगी नाही अन् आत बसून राहण्याची सोय नाही... गुदमरणार नाही तर काय?मरणाचे भय तुम्हा-आम्हाला आहे, तसे या स्लम वस्तीतल्या नागरिकांनाही आहेच. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून तेही सजग आहेतच. पण पाच-सहा जणांचे कुटुंब, त्यात लेकरांचा गलबलाट, तेथेच स्वयंपाक, तेथेच धुणी-भांडी, तेथेच अंथरूण... अशी जत्रा एका छोट्याशा खोली वजा घरात कोंबून टाकलेले हे जीवन सतत बाहेरच्या जगाकडे आशाळभूतपणे बघत असते. या वस्त्याच शेजाऱ्यांच्या साथीने जगणाऱ्या. चहापत्ती संपली, कणिक संपली की माग शेजाºयाला.. मग दुसºया दिवशी मजुरी मिळाली की नेऊन दे परत, हे येथील रीत. घरातली जागा अपुरी म्हणून या नागरिकांचा अर्धा संसारच अंगणात, रस्त्यावर. पण कोरोनाची संचारबंदी या गोष्टींना पायबंद घालणारी आहे. नाईलाज म्हणून अनेकांना घराबाहेर रस्त्यावर काही तास तरी घालवावेच लागतात, तेव्हाच घराचा श्वास मोकळा होतो. पण त्यामुळे संचारबंदीचा नियम मोडला जातो अन् पोलिसांचा फटका बसतो. संचारबंदीचे पालनही महत्त्वाचेच अन् या गरिबांचे घराबाहेर निघणेही अपरिहार्यच... आता १४ एप्रिलपर्यंत हा कोंडमारा चालणार आहे.काही टोळक्यांचा जाणीवपूर्वक उच्छाददरम्यान, याच वस्त्यांच्या आडोशाने काही टवाळखोर तरुणांचे टोळके संचारबंदीचे जाणीवपूर्वक वाटोळे करताना दिसतात. मुद्दाम चौकात बसून असतात. तंबाखू, खºर्यांची गुपचूप विक्री करणारेही यातच सामील झालेले आहेत. मात्र अशा ठिकाणांवर पोलिसांचे वाहनही क्वचित चक्कर टाकून परत जाते. संचारबंदी नव्हे पण कोरोना टाळण्यासाठी तरी अशा टोळक्यांवर जरब बसविण्याची गरज आहे.मरणारच आहो, तर प्या दारू!हातावर आणून पानावर खाणाºया अनेक कुटुंबांची संचारबंदीने कोंडी केली आहे. अशातच कष्टकरी पण अल्पशिक्षित लोकांमध्ये भलत्याच अंधश्रद्धा वाढल्या आहेत. पिंपळगाव परिसरातील एका वस्तीत सध्याच अशीच एक अफवा आहे. कोरोनामुळे सारेच मरणार आहे... त्यामुळे येथील अनेक जण २४ तास दारुची हौस भागवित आहेत. यातून लहान मुलेही सुटलेली नाहीत.बाप-लेक संघर्षकाही स्लम वस्त्यांकडे प्रशासनही अनेकदा संशयानेच बघते. मात्र येथे अनेक शिकणारीही मुले आहेत. शिकल्यावरही काहींच्या वाट्याला बेरोजगारी आलीय. अशा बेरोजगारांना इतरवेळी बापाची नजर चुकवून दिवसभर घराबाहेर भटकावे लागते. गरिबीतून उडणाऱ्या बाप-लेकाच्या भांडणाच्या ठिणग्या येथे नव्या नाहीत. पण आता संचारबंदीमुळे गरिबीशी झगडणारा बाप आणि बेरोजगारीने मान तुकविणारा तरुण २४ तास एकाच घरात राहताना अनेकांची घुसमट होत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस