शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
3
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
4
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
5
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
6
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
7
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
8
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
9
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
10
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
12
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
13
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
14
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
15
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
16
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
17
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
18
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
19
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
20
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!

सांगा, एसटी बसस्थानकात पार्किंगची सोय आहे कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 9:54 PM

एसटी बसस्थानकावर अवघ्या पाच-दहा मिनिटांसाठी गेले असताना वाहतूक पोलिसांकडून होणाºया कारवाईने यवतमाळातील वाहनधारक प्रचंड त्रस्त आहे. बसस्थानकावर वाहन ठेवण्यासाठी तात्पुरती कोणतीही पार्किंग व्यवस्था नाही

ठळक मुद्देविभाग नियंत्रकांना सवाल : दहा मिनिटांसाठी स्टँडवर वाहने ठेवायची काय ?

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : एसटी बसस्थानकावर अवघ्या पाच-दहा मिनिटांसाठी गेले असताना वाहतूक पोलिसांकडून होणाºया कारवाईने यवतमाळातील वाहनधारक प्रचंड त्रस्त आहे. बसस्थानकावर वाहन ठेवण्यासाठी तात्पुरती कोणतीही पार्किंग व्यवस्था नाही. त्यात उलट कारवाईचा सामना करावा लागत असल्याने एसटी आगार प्रमुख व विभाग नियंत्रकाविरुद्ध तीव्र असंतोष पहायला मिळतो आहे. यातूनच विभाग नियंत्रकांना भविष्यात युवक कार्यकर्त्यांच्या उग्र आंदोलनाचा अचानक सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.कुणीही व्यक्ती आपल्या नातेवाईकाला सोडण्यासाठी यवतमाळच्या एसटी बसस्थानकावर गेल्यास तो आपले वाहन अवघ्या पाच-दहा मिनिटासाठी कुठे तरी साईडने पार्क करतो. परंतु तो परत येईपर्यंत वाहतूक पोलिसांच्या टोर्इंग व्हॅनने त्याचे वाहन उचलून नेलेले असते. गेल्या काही महिन्यात शेकडो प्रवाशांना या कारवाईचा सामना करावा लागला. एसटी बसस्थानकात वाहनांच्या पार्किंगसाठी अधिकृत कुठेही जागा नाही. याबाबत विचारणा केल्यास सायकल स्टँडवर आपली वाहने ठेवण्याचा सल्ला दिला जातो. अवघ्या पाच-दहा मिनिटाच्या कामासाठी सायकल स्टँडवर आपले वाहन लावण्यासाठी वेळ व पैसा खर्ची घालणे कुणालाही परवडणारे नाही. विशेष असे सदर सायकल स्टँड संचालकाचाच बसस्थानकातील उभ्या असलेल्या दुचाकी-चारचाकी वाहनांवर कारवाईसाठी आग्रह असतो. वेळप्रसंगी वाहतूक पोलिसांशीही ही कारवाई व्हावी म्हणून हुज्जत घातली जाते. कित्येकदा तर एसटीची यंत्रणाच कारवाईसाठी वाहतूक पोलिसांना पाचारण करते. सायकल स्टँड मिळविण्यासाठी एसटी महामंडळाकडे भरलेल्या पैशाची वसुली व्हावी म्हणून दुचाकी वाहनधारकांवर तात्पुरत्या पार्किंग पोटी थेट दंडात्मक कारवाईचा आग्रह राहत असल्याची प्रवाशांची ओरड आहे. या प्रकरणात एसटी व वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचाऱ्यांची सायकल स्टँडच्या यंत्रणेसोबत मिलिभगत असण्याची शक्यता काही वाहनधारकांनी बोलून दाखविली आहे. एसटी बसस्थानकातील या सक्तीच्या कारवाईचा फटका अनेकदा सकाळी विविध वृत्तपत्रांचे वितरण करणाºया वितरकांनाही सहन करावा लागतो आहे. त्यांची वाहने उचलून नेण्याचे प्रकारही घडले आहेत.एसटीच्या विभाग नियंत्रक व यवतमाळ आगार प्रमुखांनी आधी दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी तात्पुरत्या स्वरुपात का होईना पार्किंगची जागा उपलब्ध करून द्यावी व नंतरच वाहतूक पोलिसांना दंडात्मक कारवाईसाठी बसस्थानकात एन्ट्री द्यावी, अशी एकमुखी मागणी वाहनधारकांमधून केली जात आहे.प्रवाशांच्या असुविधांकडे दुर्लक्षएसटी बसस्थानकावर पार्किंग नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. याकडे आगार प्रमुख व प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. याठिकाणी पाकिटमारी देखील मोठ्या प्रमाणात चालते. अनेक घटना घडूनही पोलिसांच्या निर्देशाला केराची टोपली दाखवित येथे सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा लागलेले नाहीत. अशा एक ना अनेक अडचणी एसटी प्रवाशांपुढे आहेत. सोबत आणलेले वाहन सांभाळत महिला व वृद्धांसाठी जागा पकडण्याची सर्कस नागरिकांना करावी लागत आहे. या त्रासामुळे अनेकांनी खासगी बसेसना प्राधान्य देणे सुरू केले आहे.