ठळक मुद्देदिग्रसमध्ये आॅटोरिक्षा पेटला : वाढत्या काहिलीत पाणीटंचाईची भर
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या चार दिवसांपासून भडकलेले तापमान रविवारीही ४५ अंशाच्या पलिकडे गेले होते. वाढत्या तापमानामुळे जिल्हाभरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.रविवारी दुपारी प्रचंड तापमानामुळे दिग्रस येथे उभ्या आॅटोरिक्षाने पेट घेतला. फिरोजशाह सत्तारशाह रा. संभाजीनगर यांनी आपला आॅटोरिक्षा गवळीपुरा परिसरातील आर्णी नाक्यावर उभा केला असता तो अचानक पेटला. दोन दिवसापूर्वी जोडमोहा येथे धावत्या बसनेही तापमानामुळे पेट घेतला होता. जीवघेण्या उन्हामुळे यवतमाळ शहरात रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत आहे. त्याच वेळी उष्माघात, भोवळ येणे असे प्रकार वाढले आहे. तर दुसरीकडे उन्हाच्या दाहकतेमधून वाचण्यासाठी फळांची खरेदी वाढली असून रसायन वापरुन फळ पिकविण्याचे प्रकार घडत आहे.