शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

दहा आरोपींना गुजरातमधून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 10:06 PM

शहरातील पाटीपुरा परिसरात टोळी युध्द्धातून ‘वट्टा’ समर्थकांनी ‘अंकुश’ टोळीतील हनीचा खून केला होता. तेव्हापासून ही टोळी फरार होती.

ठळक मुद्देहनी खूनप्रकरण : मजूर बनून वावरत होते, शहर ठाण्याच्या डीबी पथकाची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील पाटीपुरा परिसरात टोळी युध्द्धातून ‘वट्टा’ समर्थकांनी ‘अंकुश’ टोळीतील हनीचा खून केला होता. तेव्हापासून ही टोळी फरार होती. शहर ठाण्यातील शोध पथकाच्या पाच अधिकारी, कर्मचाºयांनी दहा जणांच्या टोळीला गुजरातमधील दिंडोली येथून सोमवारी सकाळी अटक केली.अश्विन ऊर्फ गोंड्या दीपक तेलंग (२४) रा. आंबेडकरनगर, सुहास अनिल खैरकार (२२), आदेश ऊर्फ आदया अनिल खैरकार (२०) दोघेही रा.अशोकनगर, मॅगी ऊर्फ रोहित विजय ओंकार (२०) रा. दलित सोसायटी, वैभव कृष्णराव नाईक (१८) रा. बांगरनगर, सुशील ऊर्फ धम्मा आनंद बनकर (२४), रोशन पुरूषोत्तम प्रधान (१८) दोघेही रा. अंबिकानगर, अनुप ऊर्फ दादू अनिल रामटेके (२२) रा. नगरपरिषद शाळेजवळ पाटीपुरा, सचिन ऊर्फ बत्या अशोक भोयर (१९) रा. आठवले ले-आऊट, नयन नरेश सौदागर (१९) रा. दिंडोली, संतोषनगर गुजरात, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.या आरोपींनी त्यांचा मित्र सुनील ऊर्फ वट्ट्या पवार, रा. तलावफैल याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी ३१ आॅक्टोबरला सायंकाळी अनिल ऊर्फ हनीसिंग विजय थूल (२७) याचा मिलींद गेडाम यांच्या घरात शिरून खून केला. या हल्ल्यात हनीसिंगचा मित्र प्रेमराज हा गंभीर जखमी झाला. अटकेतील आरोपींनी वट्ट्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी ‘अंकुश’चा खून करण्याचा बेत आखला होता. मात्र घटनेच्या दिवशी तो हाती न लागल्याने त्यांनी हनीला संपविल्यानंतर आरोपी पसार झाले.शहर पोलिसांना आरोपी वैभव नाईक हा काही दिवस सुरत येथे असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे डीबी पथकाचे सहायक निरीक्षक संतोष इंगळे यांनी पाच कर्मचाºयांसह सुरत गाठले. नंतर मोबाईल सीमचे लोकशन स्ट्रेस करीत थेट गुजरातमधील दिंडोली गाठले. तेथे सोमवारी सकाळी तीन आरोपी त्यांच्या हाती लागले. नंतर उर्वरित सात जाणांना ताब्यात घेतले. ही कामागिरी एसपी एम. राजकुमार, अ‍ॅडीशनल एसपी अमरसिंग जाधव, एसडीपीओ पीयूष जगताप, ठाणेदार यशवंत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनात जमादार गजानन क्षीरसागर, नीलेश भुसे, अल्ताफ शेख, रवी आडे, नीलेश घोसे यांनी पार पाडली. तपास सहायक निरीक्षक विनोद झळके करीत आहे.तलवारी चालविताना आरोपीही जखमीहनीसिंगवर तलवारीने हल्ला करताना आरोपी वैभव नाईक हा गंभीर जखमी झाला. त्याच्या हाताला २२ टाके पडले आहेत. इतर दोघांची बोटे कापली आहे. सूड भावनेने पेटलेल्या आरोपींच्या हल्ल्यात हनीसिंगच्या दुचाकीची पेट्रोल टँकही सुटली नाही. यावरून तलवारीचे वार कितील घातक होते, याची कल्पना येते.