शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

दहा महिन्यानंतरही ६० हजार शेतकरी कर्जमाफी बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 11:33 PM

शासनाने कर्जमाफीची घोषणा करून आता दहा महिने उलटले तरी जिल्ह्यातील ६० हजार शेतकरी अद्यापही कर्जमाफी प्रक्रियेच्या बाहेरच आहेत. आकडेवारीतील तफावतीने त्यांची नावे ग्रीन यादीत आलीच नाही.

ठळक मुद्देआयटी विभागाच्या अहवालाची प्रतीक्षा : वनटाईम सेटलमेंटसाठी मुदतवाढ पण पैसे भरायची सोयच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासनाने कर्जमाफीची घोषणा करून आता दहा महिने उलटले तरी जिल्ह्यातील ६० हजार शेतकरी अद्यापही कर्जमाफी प्रक्रियेच्या बाहेरच आहेत. आकडेवारीतील तफावतीने त्यांची नावे ग्रीन यादीत आलीच नाही. कर्जमाफीच्या जाचक अटीचा फटका या शेतकऱ्यांना बसला आहे.जिल्ह्यातील दोन लाख ४० हजार शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले. जिल्ह्यात कर्जमाफीस पात्र ठरलेले जिल्हा बँकेचे एक लाख १३ हजार ५५७, राष्ट्रीयकृत बँकेचे ६७ हजार २७२ आणि ग्रामीण बँकेचे सात हजार ८३५ शेतकरी आहे. या शेतकºयांच्या खात्यात ९९४ कोटी ५६ लाख रुपयांची रक्कम वळती करण्यात आली आहे. यातील एक लाख ४८ हजार शेतकरी नवीन कर्ज मिळविण्यासाठी पात्र ठरले आहे.दुसरीकडे ६० हजार शेतकरी अद्यापही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. वनटाईम सेटलमेंट आणि मिसमॅचच्या यादीला ग्रीन सिग्नल न मिळाल्याने हे शेतकरी कर्जमाफीपासून दूर आहे. गतवर्षी जून महिन्यात मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती. तब्बल दहा महिन्याचा कालावधी लोटला तरी कर्जमाफीची भिजत घोंगडे आहे. आकडेवारीतील तफावतीमुळे या शेतकºयांची नावे ग्रीन यादीत आली नाही. मुंबईच्या आयटी विभागाकडे त्या संबंधीचा अहवाल बँकांनी पाठविला. मात्र तेथून अद्यापपर्यंत मान्यता मिळाली नाही. शेतकरी आपले नाव ग्रीन यादीत आहे काय, हे पाहण्यासाठी दररोज बँकेचे उंबरठे झिजवित आहे. बँक व्यवस्थापकांना माहिती विचारत आहे. परंतु त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे.कर्जाची रक्कम ५०० कोटींच्या घरात६० हजार शेतकºयांमध्ये वनटाईम सेटलमेंट आणि मिसमॅचमधील शेतकऱ्यांचा समावेश आहे. दीड लाख रुपयाप्रमाणे ६० हजार शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे ९०० कोटी रुपये होतात. यातील ३० टक्के शेतकरी मिसमॅच यादीत आहे. त्यामुळे दीड लाखांच्या आत कर्ज धरले तरी सरासरी ५०० कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा पेच सध्या जिल्ह्यापुढे निर्माण झाला आहे.नवीन कर्जास विलंबदरवर्षी शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज एप्रिल महिन्यात दिले जाते. मात्र यावर्षी कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर कागदपत्रांची पूर्तता करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे अर्धा एप्रिल महिना संपला तरी जिल्ह्यातील शेतकºयांना खरीप पीक कर्ज मिळाले नाही.