शहरं
Join us  
Trending Stories
1
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
2
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
3
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
4
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?
5
"घरी ऐश्वर्या आराध्याची काळजी घेते म्हणूनच मी...", अभिषेक बच्चनचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला- "पुरुषांमधला दोष हाच की..."
6
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
7
आपल्यावर गुरुकृपा आहे किंवा होणार आहे हे कसे ओळखायचे? जाणून घ्या पूर्वसंकेत!
8
८०० जणांविरोधात एआयआर, ड्रोन फुटेजमधून घेतले फोटो, संभलमधील दंगेखोरांवर मोठ्या कारवाईची तयारी
9
Utpanna Ekadashi 2024: निर्मळ मनाने विष्णुभक्ती केली असता त्याचे अनपेक्षित फळ मिळते; कसे ते पहा!
10
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
11
'जानी दुश्मन'चा खेळ खल्लास! बुमराह-विराट यांच्यात दिसला 'मिले सुर मेरा तुम्हारा सीन' (VIDEO)
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
13
उत्पत्ति एकादशी: ६ राशींना उन्नती, यश-प्रगतीची संधी; श्रीविष्णूंची कृपादृष्टी, लाभच लाभ!
14
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
15
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
16
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
17
बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार!
18
NTPC चा शेअर तुम्हाला अलॉट झालाय का? कसं चेक कराल, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर
19
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
20
'कांतारा'च्या कलाकारांसोबत मोठी दुर्घटना! शूटिंगवरुन परतताना बस पलटी, अनेक जण जखमी

दहा विषय समित्या आणि ८३ सदस्य

By admin | Published: May 09, 2017 1:16 AM

जिल्हा परिषदेच्या दहा विषय समित्यांवर ८३ सदस्य निवडून द्यायचे आहेत. मंगळवार ९ मे रोजी ही निवड प्रक्रिया होणार आहे.

जिल्हा परिषदेत आज निवडणूक : स्थायी, बांधकामसाठी जोर, दोन-दोनचा फॉर्म्युलालोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या दहा विषय समित्यांवर ८३ सदस्य निवडून द्यायचे आहेत. मंगळवार ९ मे रोजी ही निवड प्रक्रिया होणार आहे. त्यात जिल्हा परिषदेचे कॅबिनेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थायी समिती आणि सर्वाधिक वरकमाईचा स्त्रोत असलेल्या बांधकाम समितीसाठी सदस्यांमध्ये जोरदार स्पर्धा पहायला मिळते आहे. बहुतांश समित्यांवर आठ सदस्य आहेत. केवळ कृषी, समाज कल्याण आणि जलव्यवस्थापन व स्वच्छता या समित्यांवर अनुक्रमे १०, ११ व ६ सदस्य निवडले जाणार आहेत. शिक्षण, बांधकाम, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्ध शाळा, अर्थ, महिला व बालकल्याण या समित्यांवर प्रत्येकी आठ सदस्य निवडून द्यायचे आहेत. सर्वसंमतीने नावे निश्चित व्हावी, निवडणूक घेण्याची वेळ येऊ नये या दृष्टीने पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेस-भाजपा-राष्ट्रवादीची सत्ता आहे. शिवसेना विरोधी बाकावर आहेत. या चारही पक्षांनी प्रत्येकी दोन-दोन सदस्य समित्यांवर घ्यावे, असे ढोबळ समीकरण ठरले असल्याची चर्चा आहे. मात्र ऐनवेळी त्यात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बांधकाम विभागात होणारी ‘उलाढाल’ लक्षात घेता अनेक सदस्य या समितीसाठी आग्रही आहेत. त्यानंतर शिक्षण व आरोग्य समितीला पसंती दर्शविली जात आहे. अन्य समित्यांना मात्र सदस्यांकडून तेवढे महत्व दिले जात नाही. स्थायी समितीत काँग्रेसमधून कोण याचा निर्णय घेण्यासाठी सोमवारी सायंकाळी काँग्रेसच्या नेते व सदस्यांची बैठकही बोलविण्यात आली आहे. काँग्रेसचे गटनेते स्थायी समितीसाठी स्पर्धेत स्थायी व बांधकाम या समित्यांसाठी सर्वाधिक रस्सीखेच आहे. काँग्रेसकडून गटनेते राम देवसरकर यांचा जोर आहे. पहिल्याच बैठकीत ‘परफॉर्मन्स’ न दाखविणे, पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहणे यामुळे गटनेत्याबाबत काँग्रेसमध्ये काहीशी नाराजी पहायला मिळते. शिवाय सभागृहाचे सत्ताधारी पक्षाचे गटनेते हे पद असताना आणखी पद कशासाठी असा काँग्रेसच्या गोटातील सवाल आहे. स्थायी समितीसाठी माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांच्या विधानसभा मतदारसंघातील स्वाती येंडे, प्रा. वसंतराव पुरके यांच्या मतदारसंघातील जया पोटे यांची नावेही चर्चेत आहेत. या पैकी कुणाची वर्णी लागते यावर नजरा आहेत. यापैकी एका सदस्याला बांधकाम समितीकडे वळविले जाण्याची शक्यता आहे.