शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

पैनगंगा तीरावर भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 9:50 PM

पैनगंगा नदी तीरावरील विदर्भ-मराठवाड्यातील तब्बल ५० गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. नळयोजना अखेरच्या घटका मोजत असून कोरड्या पडलेल्या नदी पात्रात इसापूर धरणाचे पाणी सोडण्याची मागणी नागरिक करीत आहे.

ठळक मुद्दे५० गावांना फटका : नळ योजनांच्या विहिरी तळाला, जनावरांचे हाल

ऑनलाईन लोकमतउमरखेड : पैनगंगा नदी तीरावरील विदर्भ-मराठवाड्यातील तब्बल ५० गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. नळयोजना अखेरच्या घटका मोजत असून कोरड्या पडलेल्या नदी पात्रात इसापूर धरणाचे पाणी सोडण्याची मागणी नागरिक करीत आहे. यासाठी त्यांनी आंदोलनाची तयारी चालविली आहे.उमरखेड तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदी तीरावर उमरखेड तालुक्यातील आणि मराठवाड्यातील ५० गावे आहेत. या गावासाठी पैनगंगा जीवनदायी आहे. पैनगंगेच्या पाण्यावर अनेकांचे शेत ओलित होतात. तर बहुतांश गावातील नळ योजनेच्या विहिरी नदी तीरावरच आहे. पूर्वी बाराही महिने खळखळून वाहणारी पैनगंगा अलिकडच्या काळात हिवाळ्यातच कोरडी पडते. यंदा तर अपूऱ्या पावसाने पैनगंगेला पूर ही गेला नाही. परिणामी हिवाळ्यातच पैनगंगा करोडी पडली. त्यामुळे भांबरखेडा, तिवरंग, हातला, दिवटपिंपरी, पळशी, नागापूर, बेलखेड, चिंचोलीसंगम, मार्लेगाव, तिवडी, टाकळी, विडूळ, चालगणी, साखरा, खरूस, देवसरी, काटखेड, लोहरा, देवसरी, दिघडी, उंचवडद, चातारी, बोरी, कोपरा, मानकेश्वर, सोईट, सिंदगी, गाजेगाव, कावळेश्वर, बिटरगाव, भोजनगर, जेवली, पेंदा, सोनदाबी, मोरचंडी, जवराळा, गाडी बोरी, मुरली, सहस्त्रकुंड, पिंपळगाव, खरबी, परोटी वन यासह अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.डिसेंबर महिन्यातच पैनगंगा कोरडी पडल्याने पाणी टंचाईची चाहूल लागली होती. परंतु या दोन महिन्यात प्रशासनाकडून कोणत्याही प्रभावी उपाय योजना करण्यात आल्या नाही. परिणामी आता फेब्रुवारी महिन्यातच तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. माणसांसोबतच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. इसापूर धरणाचे पाणी पैनगंगेच्या पात्रात सोडण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून या भागातील नागरिक करीत आहे. परंतु अद्यापपर्यंत इसापूरचे पाणी नदी पात्रात सोडले नाही. धरणाचे पाणी शहरांसाठी आरक्षित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पैनगंगा कोरडी पडल्याने या भागातील नागरिक पाण्यासाठी भटकंती करीत आहे.शासनाच्या विरोधात एल्गारपैनगंगा नदी पात्रात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी गुरुवारी नदी तीरावरील बोरी येथे विदर्भ-मराठवाड्यातील नागरिकांची बैठक झाली. अध्यक्षस्थानी हदगावचे शिवसेना आमदार नागेश पाटील आष्टीकर उपस्थित होते. नागरिकांच्या कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यासाठी शासनाने पैनगंगेच्या पात्रात ठिकठिकाणी बंधारे बांधण्याची मागणी करण्यात आली. या बैठकीला परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी पाणीटंचाई असतानाही प्रशासन कुठलीच दखल घेत नसल्याने रोष व्यक्त केला. आमदार नागेश पाटील यांनी जनभावना लक्षात घेता शासनाच्या विरोधात एल्गार पुकारणार असल्याचे सांगितले. या बैठकीला पांडुरंग देवसरकर, तुकाराम माने, विठ्ठलराव वानखेडे, भगवान माने, धनंजय माने, डॉ. वसंतराव खंदारे, सुदर्शन रावते, प्रसाद माने, वामनराव वानखेडे, श्रीधर देवसरकर, मदन जाधव, रामराव पाटील, दादाराव पाटील, राजू माने उपस्थित होते.