लोकमत न्यूज नेटवर्कनेर : तालुक्यातील सिंदखेड, खुटाफळी, पिंपळगाव(डुब्बा), उत्तरवाढोणा शेतशिवारात वाघाचा धुमाकूळ सुरू आहे. धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी वनविभागाकडेवाघाच्या वास्तव्याबाबत वारंवार पाठपुरावा केला आहे. या परिसरात सलग आठ दिवसात पाच जनावरांची शिकार वाघाने केली आहे.रबीचा हंगाम असल्याने सिंचनासाठी शेतकऱ्यांना रात्री शेतात जावे लागत आहे. अशातच परिसरामध्ये वाघाची दहशत निर्माण झाली आहे. पट्टेदार वाघ आणि चार बिबटही येथे वावरत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. पिंपळगाव येथील सरपंच झुंबरसिंग चव्हाण यांनी तर वनविभागाला इशारा देत तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. चिखली(कान्होबा), सराटा, मक्रपूर या शेतशिवारात वाघाच्या डरकाळ्या स्पष्टपणे ऐकायला येत असल्याचे तेजस खोडके, मोहन चव्हाण यांनी सांगितले. मांगलादेवी येथील एका शेतकऱ्याला वाघाचे दर्शन झाले. मंगरूळ येथे वाघाच्या पायाचे ठसे आढळले. वनविभागाच्या चमूने या ठश्यांचे फोटो घेतले आहे. वयस्क वाघ येथे फिरत असल्याचे सिद्ध झाले आहे. शेताच्या रखवालीसाठी कुंपनात विजेचा प्रवाह सोडून शेतकरी रात्रीची जागल करत आहे. चिकणी येथे याच प्रकारातून एका इसमाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. वाघामुळे निर्माण झालेली स्थिती शेतकऱ्यांच्या जीवावर उठली आहे. सातत्याने पाळीव प्राण्यांच्या शिकारी होत असल्याने मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येते. वनविभागाकडून ग्रामस्थांच्या दाव्याची खातरजमा केली जात आहे. जंगलात पुरावे गोळा करण्याची मोहीम सुरू आहे.या भागात वाघाचे अस्तित्व नसून प्रत्यक्ष पाहणी केली आहे. जगलामध्ये बिबट आढळला. त्याचा नागरिकांना कोणताही त्रास नाही. नागरिक जंगलात वावरणाºया तडसाला वाघ समजून घाबरत आहेत. या प्रकरणांची स्वत: पडताळणी करत आहो.- विनोद कोहळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, नेरजंगलात चार बिबट व एक वाघ असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे. सध्या शेतात कापसाची वेचणी सुरू आहे. तूर, गहू ही पिके आहेत. जागलीला गेल्याशिवाय पर्याय नाही. मात्र वाघाच्या दहशतीने शेतशिवारात फिरणे कठीण झाले आहे.- झुंबरसिंग चव्हाण, सरपंच, पिंपळगाव(डुब्बा)
सिंदखेड, खुटाफळी जंगलात वाघाची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 6:00 AM
रबीचा हंगाम असल्याने सिंचनासाठी शेतकऱ्यांना रात्री शेतात जावे लागत आहे. अशातच परिसरामध्ये वाघाची दहशत निर्माण झाली आहे. पट्टेदार वाघ आणि चार बिबटही येथे वावरत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. पिंपळगाव येथील सरपंच झुंबरसिंग चव्हाण यांनी तर वनविभागाला इशारा देत तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
ठळक मुद्देपाच जनावरांची शिकार : चार बिबट असल्याचा ग्रामस्थांचा दावा, शेतकऱ्यांची रात्र जागल धोक्यात