थाळीनाद : अंगणवाडी सेविकांच्या प्रलंबित प्रश्नाकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी सेविका शनिवारी यवतमाळच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर धडकल्या. त्यांनी या ठिकाणी थाळीनाद करून शासनाच्या विरुद्ध प्रचंड घोषणा दिल्या. या ठिकाणी करण्यात आलेल्या थाळीनादाने परिसर दणाणून गेला होता. विविध मागण्या तत्काळ मान्य करण्याची मागणी करणारे एक निवेदन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले. (वृत्त/४)
थाळीनाद :
By admin | Published: January 03, 2016 2:54 AM