शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
2
मराठा तितुका मेळवावा नाही, ओबीसी संपावावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
4
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
5
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
6
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
7
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
8
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
9
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
10
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
11
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
12
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
13
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
14
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"
15
५० सेकंदांची फी ५ कोटी, प्रायव्हेट जेटने प्रवास; 'ही' अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण
16
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
17
अमित शाहांकडून महिला शेतकऱ्यांना गिफ्ट, उत्पन्न वाढवण्यासाठी सुरु केला 'हा' उपक्रम
18
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
19
दलजीत कौरला पतीच्या गर्लफ्रेंडनेच दिली धमकी, अभिनेत्रीनेही दिलं जशास तसं उत्तर; नेमकं काय घडलं?
20
Bigg Boss Marathi 5: "२ हजारांचा सेकंड हँड मोबाईल घेतला, डिस्प्ले गेलेला"; सूरजने सांगितला पहिल्या फोनचा किस्सा

विद्यार्थिनीवर अत्याचार करणारा सैतान निघाला सराईत गुन्हेगार, २२ पेक्षा अधिक गुन्हे शिरावर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 10:30 AM

पॅरोलवर गावी आला अन् पुन्हा केला गुन्हा, अखेर अटक

उमरखेड (यवतमाळ) : शाळेत निघालेल्या एका चिमुरडीला खोटी बतावणी करत तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या ४८ तासात बेड्या ठोकल्या. अजिज खान मोहमद खान पठाण (४९) रा. नागापूर रुपाळा, असे या आरोपीचे नाव आहे. दरम्यान अजिज हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या शिरावर २२ पेक्षा अधिक गुन्हे नोंद असल्याचे गुरुवारी जिल्हा पोलिस अधीक्षक डाॅ. पवन बनसोड यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

१० ऑक्टोबर रोजी शाळेला जाण्यासाठी निघालेल्या ११ वर्षीय मुलीला त्याने पळशी (नवीन) बसथांब्यावर सकाळी साडेदहा वाजता गाठले. बसची वाट पाहत असलेल्या या मुलीला भावनिक बतावणी करून आरोपीने आपल्या दुचाकीवर बसवून बेलखेड शिवारात नेले. तेथे बळजबरी अत्याचार केला. नंतर तिला शहरात आणून सोडले. त्यानंतर चिमुकलीने आपबिती कथन केले. पोफाळी पोलिसांनी मुलीचे बयाण नोंदवून गुन्हा दाखल केला आणि घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच आरोपीचा शोध सुरु केला.

परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक साहाय्य व नागरिकांच्या मदतीतून शहरानजीक असलेल्या नागापूर (रुपाळा) येथून आरोपी अजिज खान मोहमद खान पठाण याला अटक करण्यात आली. आरोपी अजिज खान मोहमद खान पठाण याने यापूर्वी अनेक महिलावर लैंगिक अत्याचार करुन त्यांना ठार मारले. हे गुन्हे मराठवाडा-विदर्भातील पोलिस ठाण्यांमध्ये नोंद असून तो सराईत गुन्हेगार आहे. नुकताच तो कारागृरातून पॅराेलवर गावी आला होता. नेमका याच काळात त्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला.

अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक विनय कोते, एसडीपीओ प्रदीप पाडवी, पोफाळी ठाणेदार दीपक ढोमणे पाटील यांच्यासह उमरखेड ठाणेदार शंकर पांचाळ आणि पाच पथकातील कर्मचारी यांनी आरोपीचा छडा लावला. या गुन्ह्यात पोफाळी ठाणेदार दीपक ढोमणे पाटील तपास करीत असून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पत्रपरिषदेत सांगण्यात आले.

आजी-माजी आमदारांनी केली मागणी

उमरखेड शाळा परिसरात रात्री काही शाळकरी मुले व काही तरुण अमली पदार्थ सेवनाच्या आहारी जात आहे. पोलिसांनी या प्रकाराला आळा घालण्यासाठी छापे मारावे, असे पत्रपरिषदमध्ये माजी आमदार राजेंद्र रजरधने यांनी सांगितले. यावेळी जिजाऊ बिग्रेडच्या जिल्हा अध्यक्षा सरोज देशमुख, दता गंगाधर उपस्थित होते. पत्रपरिषदेनंतर आमदार नामदेव ससाने, भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी एसपींची भेट घेत आरोपीला कठोर शिक्षेची मागणी केली.

आज उमरखेडमध्ये रास्ता रोको

निरागस चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी जन आंदोलन आधार संघर्ष समितीच्या वतीने १३ ऑक्टोबर रोजी स्थानिक संजय गांधी चौकात सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. नागरिकांनी या आंदोलनात सामील होण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी केले आहे.

आरोपी अजिज खान मोहमद खान पठाण रा. रुपाळा (नागापूर) याच्यावर खुनाचे १० गुन्हे व इतर १२ असे २२ च्या वर गुन्हे नांदेड, यवतमाळ जिल्ह्यात दाखल आहेत. इतर गुन्ह्यात शिक्षा भोगत असताना तो २७ सप्टेंबर रोजी जमानतीवर आला होता. त्यानंतर हा गुन्हा घडवून आणला. हा खटला जलदगती न्यायालयात चांगले सरकारी अभियोक्ता मागवून आरोपीला लवकर जमानत मिळू नये यासाठी प्रयत्न असणार आहेत.

- डॉ. पवन बनसोड, जिल्हा पोलिस अधीक्षक

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणYavatmalयवतमाळArrestअटक