शहरं
Join us  
Trending Stories
1
Victory Parade : मरीन ड्राईव्ह परिसरात मोठी गर्दी; चाहत्यांचा महासागर, CM शिंदे ॲक्शन मोडवर
2
लोकसभेतील यशानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला, या दोन राज्यांत स्वबळावर निवडणूक लढणार
3
मुंबईकरांना सलाम; हजारो चाहत्यांमध्ये अडकली अॅम्ब्युलन्स, लगेच मोकळी करुन दिली वाट...
4
मुंबई: वानखेडे, मरिन ड्राइव्हवर तोबा गर्दी; 'टीम इंडिया'ची बस 'ट्रॅफिक जाम'मध्ये अडकली!
5
Team India Arrival LIVE: टीम इंडियाचे 'हार्दिक' स्वागत; रोहितसेनेला पाहण्यासाठी उसळला चाहत्यांचा महासागर
6
Zomato चा मोठा निर्णय, देशभरात बंद केली ही खास सेवा! अशी आहे शेअरची स्थिती
7
Video: "तंटा नाय तर घंटा नाय..."; रितेश देशमुखच्या 'बिग बॉस मराठी ५' चा नवा प्रोमो रिलीज
8
“देशाचा पंतप्रधानच सर्वांत मोठा बुवा, तिथूनच...”; हाथरस प्रकरणावरुन संजय राऊतांचा घणाघात
9
60 वर्षांत 400 अपघात, 200 पायलट शहीद...'फ्लाइंग कॉफिन' MiG-21 हवाई दलातून हटवणार
10
“शरद पवारांच्या नेतृत्वात राज्यात मविआ सरकार अन् राष्ट्रवादी...”; रोहित पाटलांचे सूचक विधान
11
हेमंत सोरेन पुन्हा झारखंडचे मुख्यमंत्री, तुरुंगातून सुटल्यानंतर घेतली CM पदाची शपथ
12
"...तर आपण सर्व नामशेष होऊ"! इस्रो प्रमुख सोमनाथ यांचा पृथ्वीवासीयांना मोठा इशारा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाला जाणार, परराष्ट्र मंत्रालयाने तारीख सांगितली
14
"गुजरातच्या बसला पार्किंगसाठी जागा देऊ, पण भारतीय संघाची 'बेस्ट' मधूनच मिरवणूक काढा"
15
Jio आणि Airtel नंतर आता Vi चे प्लॅन महागले; जाणून घ्या नवीन किमती...
16
Victory Parade : Team India च्या विमानाला असाही 'सॅल्युट'! अनोख्या घटनेने वेधले सर्वांचे लक्ष
17
टोमॅटो पुन्हा २०० पार जाण्याची शक्यता; मुंबई, देशभरातील आत्ताचे दर काय...
18
विश्वविजेत्या टीम इंडियाला भेटल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली युझवेंद्र चहलची खास विचारणा, म्हणाले, ‘’हाच का तो…’’
19
राहुल गांधींनी हाती घेतले फावडे अन् कामगारांसोबत थापीही फिरवली!
20
इंडिया का राजा, रोहित शर्मा...! वानखेडेवर हिटमॅनचा जलवा; चाहत्यांचा एकच जल्लोष, Video

दोघांचा बळी घेणारी 'ती' नरभक्षक वाघिण अखेर जेरबंद; नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2022 4:31 PM

वणी तालुक्यातील कोलारपिंपरीलगतच्या सबस्टेशन परिसरात केले जेरबंद

संतोष कुंडकर

वणी (यवतमाळ) : गेले अनेक दिवस वणी परिसरात सातत्याने धुमाकूळ घालून दोघांचा बळी घेणाऱ्या नरभक्षी वाघिणीला जेरबंद करण्यात अखेर वनविभागाला यश आले. बुधवारी सकाळी ११ वाजता वणी तालुक्यातील कोलारपिंपरीलगतच्या सबस्टेशन परिसरातील शिवारात या वाघिणीला बेशुद्ध करून पकडण्यात आले. त्यानंतर तिला गोरेवाडा (नागपूर) येथील वाईल्ड रेस्क्यू सेंटरमध्ये पाठविण्यात आले. 

मागील काही दिवसांपासून वणी तालुक्यात या वाघिणीने उच्छाद मांडला होता. १० नोव्हेंबरच्या सायंकाळी रांगणा भुरकी शिवारात अभय मोहन देऊळ‌कर या वर्षीय तरूणावर हल्ला करून त्याला या वाघिणीने ठार मारले होते. या घटने पाठोपाठ २४ नोव्हेंबरला हिच वाघिण ब्राह्मणी परिसरात शिरली. पहाटे ५ वाजताच्या सुमारास या वाघिणीने टॉवरवर काम करणाऱ्या उमेश पासवान (३५) या परप्रांतिय मजुरावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले होते. ही घटना ताजीच असताना कोलारपिंपरी परिसरात वाघिणीचा धुमाकूळ सुरू झाला. २७ नोव्हेंबर रोजी कोलारपिंपरी येथील रामदास पिदूरकर या ५८ वर्षीय गुराख्यावर हल्ला करून या वाघिणीने त्याला ठार केले. सततच्या या व्याघ्र हल्ल्यामुळे वणी परिसरात प्रचंड दहशत पसरली होती.

आठवडाभरापासून वॉच 

कोलारपिंपरी परिसरात गुराख्याला ठार केल्याच्या घटनेनंतर वनविभाग अलर्टमोडवर आला. जेरबंद करण्याचे आदेश प्राप्त होताच, गेल्या आठवडाभरापासून या नरभक्षी वाघिणीच्या हालचालीवर वनविभाग लक्ष ठेवून होता. तिला बेशुद्ध करण्यासाठी पुसद येथील वनविभागाचे खास पथक वणीत दाखल झाले होते.

वाघिणीला ट्रॅन्क्युलाईज करण्याचा प्रयत्न दोनदा फसला. मात्र बुधवारी सकाळी ही नरभक्षी वाघिण वनविभागाच्या टप्प्यात आली आणि तिला बेशुद्ध करून पकडण्यात यश आले. यामुळे तुर्तास नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. पडकण्यात आल्यानंतर सर्वप्रथम वणीचे तालुका वैद्यकीय अधिकारी मंदार मराठे यांनी वाघिणीची तपासणी केली. त्यानंतर वाघिणीला पिंजऱ्यात टाकून गोरेवाडा येथे रवानगी केली.

टॅग्स :TigerवाघYavatmalयवतमाळforest departmentवनविभाग