शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

रेती तस्करीतील मास्टर माइंड रंगेहाथ अडकला, ‘एलसीबी’ने चौसाळा मार्गावर केली कारवाई

By सुरेंद्र राऊत | Published: November 07, 2023 6:06 PM

दहशतीसाठी देशी कट्ट्याचा वापर

यवतमाळ : बाभूळगाव तालुक्यातील रेती घाटावर दबंगगिरीतून दहशत निर्माण करणारा मास्टर माइंड स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती लागला. दोन दिवसांपूर्वी त्याचा निकटवर्तीय देशी कट्टा बाळगताना पोलिसांना मिळाला. बेंबळा व वर्धा नदीतील रेती घाटांवर गेल्या दहा वर्षांपासून बबलू ठेकेदार याची दहशत आहे. तो शासकीय यंत्रणेला पैसे पुरविण्याचे काम करतो. यामुळेच आपले वाहन कुणी पकडणार नाही, अशा तोऱ्यात असतो. सोमवारी रात्री एलसीबी पथकाने त्याला रेती भरलेल्या ट्रकसह चौसाळा रोड वाघापूर येथे ताब्यात घेतले.

शेख अशफाक शेख छोटू उर्फ बबलू ठेकेदार (४२, रा. इंदिरानगर बाभूळगाव), शेख राहील शेख युनूस (२२, रा. धोंगडेबाबा ले-आऊट), ट्रकचालक शेख जमील शेख गफ्फूर (३८, रा. इंदिरानगर बाभूळगाव) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ते बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा नदीतील नांदेसावंगी घाटातून रेतीची चोरी करून ती (एमएच २९ बीई ७०७५) क्रमांकाच्या ट्रकमधून घेऊन जात होते. ही चोरीची रेती नेत असतानाच ‘एलसीबी’चे पथक तेथे पोहोचले. सहायक पोलिस निरीक्षक संतोष मनवर, जमादार विनोद राठोड यांनी कारवाई करीत तीनही आरोपींना ताब्यात घेतले. तसेच ट्रक लोहारा पोलिस ठाण्यात लावला. याप्रकरणी लोहारा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाची माहिती महसूल विभागालाही देण्यात आली आहे.दोन दिवसांपूर्वीच राहील आला जामिनावर

परिसरात दहशत पसरवून शस्त्राचा धाक दाखवत रेतीचा उपसा केला जातो. त्यासाठीच सतत अग्निशस्त्र जवळ बाळगले जाते. शेख राहील शेख युनूस याला देशी कट्ट्यासह एलसीबीने अटक केली. कारागृहातून जामीन मिळताच तो बाहेर आला आणि दुसऱ्या दिवशी रेती तस्करीचा ट्रक घेऊन आपल्या मास्टर माइंड बबलू याच्यासह यवतमाळात आला.बबलूच्या दहशतीचे अनेक कारनामे

बबलू ठेकेदाराचा रेती तस्करीतील प्रवास थक्क करणारा आहे. रोज मजुरी ते आता कोट्यवधीच्या मालमत्तेचा धनी बनला आहे. त्याच्यावर बाभूळगाव पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. तर अनेक गुन्हे रेकॉर्डवरही आलेले नाही. परिसरात दहशत निर्माण केली असून, सर्व सामान्य शेतकऱ्यांना रेती घाटावर जाण्यासाठी तो धमकावत असतो. बळजबरीने शेतकऱ्यांच्या शेतातून रेतीची वाहने टाकतो. कुणी मज्जाव केला तर जीवघेणी मारहाण केलेली आहे. ही प्रकरणे दहशतीपोटी रेकॉर्डवर आलेली नाहीत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYavatmalयवतमाळ