शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
2
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
3
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
4
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
5
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
6
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
7
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
8
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
9
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
10
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
11
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
12
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
13
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
14
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
15
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
16
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
17
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
18
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
19
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
20
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग

चोरट्यांचा डोळा आता बॅगवर, दोन घटनांत चार लाख लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2022 5:00 AM

पुष्पा प्रभुदास तांडा (वय ६०, रा. छत्रपतीनगर, नेर) ही महिला मंगळवारी बसमधून नेरकडे जात होती. तिच्यासोबत एक महिला प्रवासी बसली. तिने गर्दीचा फायदा घेऊन ३५ हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने असलेली बॅग हळूच काढून घेतली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पुष्पा तांडा यांनी शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळ बसस्थानकावरून नेरकडे जाण्यासाठी निघालेल्या महिलेची बॅग लंपास करीत २ लाख २१ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. तर दुसऱ्या घटनेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वसाहतीतून १ लाख ६५ हजारांची बॅग लांबविली. याशिवाय जिल्ह्यात सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत. पुष्पा प्रभुदास तांडा (वय ६०, रा. छत्रपतीनगर, नेर) ही महिला मंगळवारी बसमधून नेरकडे जात होती. तिच्यासोबत एक महिला प्रवासी बसली. तिने गर्दीचा फायदा घेऊन ३५ हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने असलेली बॅग हळूच काढून घेतली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पुष्पा तांडा यांनी शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या घटनेत यवतमाळ शहरातील शासकीय वसाहतीमध्ये देवी शंकर कोडापे यांच्या घराच्या बेडरूममधून चोरट्याने १ लाख ६५ हजार रुपये रोख असलेली बॅग अलगद काढून नेली. ही घटना बुधवारी रात्री अाठच्या सुमारास घडली. याप्रकरणी देवी कोडापे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. दारव्हा येथे चोरट्यांनी किन्ही वळगी शेतशिवारातून दत्ता बारकाजी नेवारे यांची एमएच-२९-एव्ही-२६१० क्रमांकाची दुचाकी लंपास केली. जिल्ह्यात मागील दोन महिन्यांत ५८ चोरीच्या घटना घडल्या आहेत. यातील एकही गुन्हा उघडकीस आलेला नाही. सातत्याने चोरटे मुद्देमाल लंपास करीत आहे. केवळ नेर पोलिसांनी घरफोडी व चोरीचे चार गुन्हे उघड केले. त्यात चोरीचा मुद्देमाल घेणाऱ्यांनाही रेकॉर्डवर आणण्यात आले. अशी कारवाई इतर पोलीस ठाण्यांमध्ये होताना दिसत नाही. चोरीच्या गुन्ह्याचा तपास होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तुम्ही घरात असाल, प्रवासात असाल तरी सुरक्षितता नाही. कधी कोठून चोर तुमचा मुद्देमाल घेऊन पळून जाईल, याची शाश्वती नाही. चोरट्यांनी निर्माण केलेली दहशत मोडीत काढण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे. 

साडेसात लाखांच्या सोने चोरीचा तपास नाही - पोस्टल मैदानाच्या परिसरातील खासगी रुग्णालयात मारेगाव येथून उपचारासाठी आलेल्या शिक्षिकेचे साडेसात लाखांचे दागिने लंपास केले. या गुन्ह्यातील महिला सीसीटीव्ही फुटेजमध्ये आली आहे. त्यानंतरही शहर पोलिसांकडून या महिलेचा शोध घेण्यात आला नाही. सुरुवातीला चौकशी करण्यात आली. मात्र, अजूनही हा गुन्हा उघड झाला नाही. असे अनेक चोरीचे गुन्हे पोलीस ठाण्याच्या फाइलमध्येच बंद आहेत.

 

टॅग्स :Thiefचोर