शहरं
Join us  
Trending Stories
1
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
3
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
5
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
6
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
7
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
8
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
9
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
10
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
12
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
13
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
14
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
15
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
16
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
17
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
18
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
19
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
20
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान

नृशंसतेचा कडेलोट! अपहरण करून महिलेवर चौघांचा पाशवी अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 1:56 PM

दारू पाजण्याचा प्रयत्न : महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

वणी (यवतमाळ) : चुना भट्टीवर काम करणाऱ्या एका ५० वर्षीय महिलेचे अपहरण करून तिच्यावर पाशवी अत्याचार करण्यात आल्याची घटना वणी तालुक्यातील राजुर कॉलरी येथे घडली. या घटनेने राजुर कॉलरी गाव हादरले असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, गुरूवारी रात्री या प्रकरणी वणी पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली. ही संतापजनक घटना २८ जूनला सायंकाळी ५ ते रात्री ११ वाजताच्या दरम्यान घडली. 

विठ्ठल ज्ञानेश्वर डाखरे (३९) रा. टागोर चौक, कपिल व्यंकटेश अंबलवार (३५) रा. जैताई नगर, मनोज अजाबराव गाडगे (४७) रा. रामपुरा वार्ड, वैभव घनश्याम गेडाम (२२) रा. आय.टी. आय. जवळ लालगुडा अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींविरूद्ध भादंवि ३५४, ३५४ (अ),(१)(एक), ३६६, ३७६(ड), ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोबतच अॅट्रॉसिटीचेही गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 

आरोपीपैकी विठ्ठल डाखरे याचे पीडित महिलेच्या मुलाकडे पैसे होते. ते मागण्यासाठी विठ्ठल डाखरे व त्याचे अन्य तीन सहकारी बुधवारी सायंकाळी राजुर कॉलरी येथील चुना भट्टी परिसरात गेले. या‌वेळी पीडिता घरी होती. तिने मुलगा घरी नसल्याचे सांगितले.  तुझा मुलगा कुठे आहे ते आम्हाला दाखव असे म्हणून तिला जबरदस्तीने कारममध्ये बसविले. त्यानंतर हे आरोपी पीडितेला घेऊन वणीत आले. येथील मुकूटबन मार्गावर असलेल्या एका बियरबारमध्ये आरोपींनी मद्यप्राशन केले. त्यानंतर ते परत कारमध्ये आले. त्यांनी तिला दारू पाजण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर पीडितेला घेऊन आरोपी मारेगाव तालुक्यातील खडकी (बुरांडा) वरून करणवाडी मार्गे नवरगावला पोहोचले. तेथे शेत शिवारात या आरोपींनी या महिलेवर पाशवी अत्याचार केले.

या महिलेसोबत अनैसर्गिक कृत्य देखील करण्यात आल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आरोपींनी पीडितेला पुन्हा राजुर कॉलरी येथील रेल्वे क्रॉसिंगजवळ आणून सोडले. या घटनेनंतर पीडित महिलेने गुरूवारी वणी पोलीस ठाणे गाठून घडलेल्या घटनेची रितसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वेगाने तपास करत अवघ्या काही तासांतच महिलेवर अत्याचार करणाऱ्या चारही आरोपींना बेड्या ठोकल्या. 

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अजित जाधव, एपीआय माया चाटसे, सपोनि माधव शिंदे, सपोनि आशिष झिमटे, पोलिस शिपाई विजय वानखेडे, अमोल नुनेलवार, शुभम सोनुले, रवी इसनकर यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगSexual abuseलैंगिक शोषणYavatmalयवतमाळ