शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

यवतमाळात चोरांच्या तब्बल १५ टोळ्या

By admin | Published: December 31, 2015 2:37 AM

कुठेही चोरी झाली की वर्षानुवर्षे रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांनाच तपासायचे या पॅटर्नला छेद देत यवतमाळ शहर पोलिसांनी अशा गुन्हेगारांची कुंडली तयार केली आहे.

पोलिसांनी बनविली कुंडली : नवे गुन्हेगार आले रेकॉर्डवर, प्रत्येकाची गुन्ह्यांची पद्धत वेगळी यवतमाळ : कुठेही चोरी झाली की वर्षानुवर्षे रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांनाच तपासायचे या पॅटर्नला छेद देत यवतमाळ शहर पोलिसांनी अशा गुन्हेगारांची कुंडली तयार केली आहे. त्यात एकट्या यवतमाळ शहरात चोरट्यांच्या एक-दोन नव्हे तर तब्बल १५ टोळ्या सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. या सर्व गुन्हेगारांना शहर पोलिसांनी आता रेकॉर्डवर घेतले आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवर आजही वर्षानुवर्षांपासूनचेच गुन्हेगार नमूद आहेत. कित्येकांनी चोरीचा मार्गही सोडला आहे. मात्र त्यानंतरही त्यांचे रेकॉर्ड कायम असून पोलीस चोरी झाली की त्याला तपासतात. जिल्ह्यातील बहुतांश पोलीस ठाण्यांमध्ये हाच फंडा वापरला जातो. चोरी झाल्यानंतर रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणे एवढीच खानापूर्ती केली जाते. अनेकदा दबाव वाढल्यास रेकॉर्डवर असलेल्यांपैकीच एका-दोघांना अटक दाखवून तपासातील प्रगतीचा देखावा निर्माण केला जातो. त्यांच्याकडून कोणतीच जप्तीही होत नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून पोलीस दलात हा पायंडा पडला आहे. परंतु यवतमाळ शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने याला फाटा देत गुन्हेगारी वर्तुळातील नव्या चेहऱ्यांची कुंडली तयार केली आहे. कालबाह्य झालेल्या व गुन्हेगारीचा खरोखरच मार्ग सोडलेल्या व्यक्तींना रेकॉर्डवरून हटविण्यात आले आहे. त्यांच्यावर वॉच मात्र कायम आहे. जुनी नावे हटवून नवी नावे रेकॉर्डवर घेतली गेली आहे. यवतमाळ शहरात गल्लीबोळात गुन्हेगारांच्या अनेक नव्या टोळ्या तयार झाल्या आहेत. त्यात १२ ते १५ अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. गेल्या काही वर्षांपासून ते गुन्हे करीत होते. मात्र त्यांचे रेकॉर्ड नसल्याने पोलिसांची त्यांच्यावर नजरच जात नव्हती. एखादवेळी संशय आला तरी त्यांच्या निरागस चेहऱ्यामागील गुन्हेगार पोलिसांच्या दृष्टीस पडत नव्हता. परंतु पोलिसांनी गुप्तचर व खबऱ्यांच्या मदतीने यवतमाळ शहरातील नव्या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविली. तेव्हा यवतमाळ शहरात एक-दोन नव्हे तर नव्या गुन्हेगारांच्या तब्बल १५ टोळ्या कार्यरत असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली. या बहुतांश टोळ्या चोरी-घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय आहेत. शरीरासंबंधीच्या लहान-मोठ्या गुन्ह्यांमध्येही त्यांचा सहभाग आढळून आला आहे. भोसा रोड, इंदिरानगर, बांगरनगर, वाघाडी, मोहा या भागातील या टोळ्या अधिक सक्रिय आहे. या सर्व टोळ्यांची सचित्र कुंडली शहर ठाण्याच्या डीबी रुममध्ये पहायला मिळते. या टोळी सदस्यांच्या नाव, गाव, पत्ता, नातेवाईकांची नावे, पत्ते अशी सर्व माहिती तत्काळ पोलिसांना एका क्लिकवर उपलब्ध होते. सुरुवातीला प्रतिबंधात्मक कारवाई करून या गुन्हेगारांना पोलिसांनी रेकॉर्डवर घेतले. नंतर त्यांचा भादंविच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग आढळून आला. या प्रत्येक टोळीची मोडस आॅप्रेन्डी (गुन्ह्याची पद्धत) वेगवेगळी आहे. कुणी दुपारी गुन्हा करतो तर कुणी सायंकाळी. त्यात अर्ध्या तासात गेम वाजविणारेही सदस्य आहेत. कुणी मुलाला ट्युशनला सोडण्यासाठी घराला कुलूप लावून बाहेर गेल्यास नेमक्या तेवढ्या १५ ते २० मिनिटात घर फोडून दागिन्यांवर हात साफ करणारी टोळीही सक्रिय आहे. या प्रत्येक टोळीने किमान दहा ते १५ गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. तशी नोंदही त्यांच्या नाव पोलीस रेकॉर्डवर करण्यात आली आहे. यातील पुनेश्वर, जितू, अविनाश या गुन्हेगारांना न्यायालयाने शिक्षाही ठोठावल्या आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)बसस्थानक, बाजारपेठेत महिला लुटारू सक्रियपोलिसांनी रेकॉर्डवर घेतलेल्या या सक्रिय गुन्हेगारी टोळ्यांमधील बहुतांश सदस्य हे कारागृहात आहेत. तीन ते चार टोळ्यांचे सदस्य अमरावती मध्यवर्ती कारागृहात तर इतर टोळ्यांचे सदस्य यवतमाळ जिल्हा कारागृहात आहेत. बांगरनगरातील चिकण्या व वट्ट्या यांची पाच ते सहा सदस्यांची टोळी मात्र बाहेर असून ती पोलिसांच्या निशाण्यावर असल्याचे सांगण्यात येते. शहरात काही महिलाही सक्रिय आहेत. गोरगरिब महिलांना बाजारपेठेत, बसस्थानकावर त्या लुटतात. दागिने-पर्स त्या लंपास करतात. मात्र त्यांना सतत तपासण्याची, त्यांच्यावर वॉच ठेवण्याची तसदी पोलीस घेत नसल्याची ओरड ऐकायला मिळते. यवतमाळ शहर ठाण्यात नव्या गुन्हेगारांची कुंडली तयार झाली असली तरी वडगाव रोड पोलीस ठाणे अशा कुंडलीपासून अद्याप कोसोदूर असल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्यातील अन्य पोलीस ठाण्यांची स्थितीही गुन्हेगारांच्या कुंडलीबाबत कमी-अधिक प्रमाणात वडगाव रोड सारखीच आहे.