शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
5
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
6
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
8
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
9
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
10
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
11
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
12
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
13
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
14
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
15
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
17
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
18
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
19
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

थोडा हैं थोडे की जरूरत हैं..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 10:27 PM

प्रज्ञावंत विद्यार्थी देशाची संपत्ती आहे. पण व्यवस्थाच अशी आहे की, अ‍ॅडमिशनसाठी नुसते मार्क असून चालत नाही... फीदेखील भरावी लागते.

ठळक मुद्दे उमरखेडमधील प्रज्ञावंतांच्या पंखांना हवे बळ : एमबीबीएसमध्ये गरिबीची आडकाठी

अविनाश खंदारे ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : प्रज्ञावंत विद्यार्थी देशाची संपत्ती आहे. पण व्यवस्थाच अशी आहे की, अ‍ॅडमिशनसाठी नुसते मार्क असून चालत नाही... फीदेखील भरावी लागते. प्रज्ञेचा अमूल्य दागिना तेथे कवडीमोल ठरतो. असेच दोन हिरे सध्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पैसे नसल्याने तडफडत आहेत. दिनेश सुरेश काटेवाड व ऋषिकेश मारोती निकम हेच ते दोघे.तालुक्यातील जेवली हे त्यांचे गाव. दुर्गम असलेल्या या गावाने एक दुर्मिळ परंपराही निर्माण केली. गरिबीला न जुमानता मुलांना उच्च शिक्षण द्यायचे. येथून आतापर्यंत २० डॉक्टर मिळाले आहेत. त्यात दिनेश आणि ऋषिकेशच्या रूपाने दोघांची भर पडणार आहे. एमबीबीएसला त्यांचा नंबरही लागला. पण गडगंज शुल्क भरण्याची ताकद मात्र त्यांच्या पालकांकडे नाही. २ आॅगस्टपर्यंत पैसे भरले नाहीत, तर हे विद्यार्थी कदाचित उदरनिर्वाहासाठी रोजमजुरीकडेच वळण्याचा धोका आहे.दिनेशच्या झोपडीत दिवाही नाही!दिनेशचे वडील सुरेश काटेवाड हे केवळ १ एकर शेतीचे कास्तकार आहेत. शेतमजुरीवरच त्यांची गुजराण. बालपणापासून हुशार असलेल्या दिनेशला त्यांनी दहावीपर्यंत गावातच शिकविले. नंतर ढाणकीच्या आदिवासी विद्यालयातून तो बारावी उत्तीर्ण झाला. मुलाने डॉक्टर व्हावे, हे स्वप्न पूर्ण होण्याइतके मार्क्स दिनेशला मिळाले. पण ‘निट’चे क्लास लावायचे तर पैसाच नव्हता. शेवटी नांदेडच्या प्राध्यापकाने मोफत वर्गात येऊ दिले. मेहनतीच्या बळावर दिनेशने निटमध्ये ३६६ मार्क्स घेतले. दिनेशचा नागपूरच्या जीएमसी कॉलेजमध्ये एमबीबीएसकरिता नंबर लागला. पण फी भरण्यासाठी पैसाच नाही. त्यांच्या मुलाने ज्ञानाचा प्रकाश खेचून आणलाय. आता समाजाने पुढाकार घेतला, तर हा प्रकाश सर्वव्यापी बनेल.ऋषिकेशच्या जन्मदात्यांची अजब कोंडीट्रकचालक म्हणून काम करणाºया मारोती निकम यांनी मुलगा ऋषिकेशला डॉक्टर करण्याचे स्वप्न पाहत रात्रन्दिवस मेहनत घेतली. याच मेहनतीमुळे तीन वर्षांपूर्वी त्यांची कंबर गेली. आता घरच्या तीन एकर शेतीसह रोजमजुरीवर त्यांची गुजराण सुरू आहे. ऋषिकेशने ढाणकीच्या संत गाडगेबाबा आश्रम विद्यालयातून ६८ टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण केली. ‘निट’च्या परीक्षेतही ३८५ गुण घेतल्याने यवतमाळच्या वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात त्याचा एमबीबीएसकरिता नंबर लागला आहे. आईवडीलांच्या एका डोळ्यात आनंदाचे तर फीसाठी पैसे नसल्याने दुसºया डोळ्यात दु:खाचे अश्रू आहेत.नांदेडात करवून घेतले ‘निट’दिनेश आणि ऋषिकेश अभावग्रस्त वातावरणात घडले. बारावीपर्यंत दुर्दम्य इच्छाशक्तीच त्यांची सारथी झाली. पण बारावीनंतर ‘निट’ परीक्षेची तयारी करायची तर क्लासेस लावावे लागणार, त्यासाठी मोठी फी मोजावी लागणार... या प्रश्नांत दोघेही अडकले. अखेर नांदेडच्या प्राध्यापकाने आपल्या क्लासेसमध्ये त्यांना मोफत प्रवेश दिला. गुणवंत पोरांनीही त्यांच्या मदतीचे चिज केले. दोघेही ‘निट’ उत्तीर्ण झाले. दोघांचाही एमबीबीएसला नंबर लागला. आता पुन्हा प्रश्न उभा राहिला तो प्रवेश शुल्काचाच. अमूल्य गुणवत्ता सिद्ध झाली आहे, केवळ पैशासाठी तिचे दमन होऊ नये, म्हणून समाजाने पुढे यावे, एवढीच अपेक्षा!