अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गरिबांच्या मुलांना नामांकित खासगी शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी राखीव ठेवल्या जाणाऱ्या जागा यंदा ६१४५ इतक्या वाढल्या आहेत. २०१८-१९ या शैक्षणिक सत्रात पहिलीत मोफत प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून राज्यात आरटीई प्रवेशासाठी १ लाख २६ हजार २१ इतक्या भरभक्कम जागा उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी १ लाख १९ हजार ८७६ जागा उपलब्ध असूनही ५६ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या.मोफत आणि सक्तीचे शिक्षण कायद्यानुसार स्वयंअर्थसहायित शाळांमध्ये पहिल्या वर्गात गोरगरिबांच्या मुलांसाठी २५ टक्के जागा मोफत प्रवेशासाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. यंदा ही आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया १० फेब्रुवारीपासून सुरू झाली असून अवघ्या दोनच दिवसात राज्यभरात ११ हजार ११८२ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज करण्यासाठी आणखी १७ दिवस म्हणजे २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत असल्याने मोफत प्रवेशासाठी यंदा अर्जांचा पाऊसच पडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, यंदा सुरूवातीला उदासीनता दाखविणाऱ्या शाळांनीही नंतर आघाडी घेत या प्रक्रियेत भराभर सहभाग नोंदविला. गेल्या वर्षी ८ हजार ३०३ शाळांनीच आरटीईसाठी नोंदणी केली होती. तर यंदा त्यात वाढ होऊन ६७७ शाळांची भर पडली आहे. आता राज्यातील ८ हजार ९८० शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी तब्बल १ लाख २६ हजार २१ जागा उपलब्ध झाल्या आहेत.बनवाबनवीवर बारकोडचा उताराआरटीई प्रवेश प्रक्रियेत वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जातो. आॅनलाईन अर्ज भरताना कुठलाही दाखला जोडावा लागत नाही. त्याचाच फायदा घेत अनेक धनदांडग्यांच्या पाल्यांनाही शाळांनी आरटीईतून प्रवेश दिल्याच्या बाबी पुढे आल्या होत्या. त्यामुळेच यंदा अर्ज भरताना उत्पन्नाच्या दाखल्यावरील बारकोडचा क्रमांक नमूद करण्याची अट टाकण्यात आली आहे.
राज्यातील सव्वालाख होतकरू चिमुकल्यांना राखीव जागांवर संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 12:41 PM
गरिबांच्या मुलांना नामांकित खासगी शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी राखीव ठेवल्या जाणाऱ्या जागा यंदा ६१४५ इतक्या वाढल्या आहेत.
ठळक मुद्देआरटीईच्या जागा वाढल्यादोन दिवसात ११ हजार अर्ज, आणखी १७ दिवस बाकी