लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील पाणीटंचाईची स्थिती गंभीर आहे. जिल्हा परिषदेची २१३ जलाशये कोरडी पडली आहेत. तर पाटबंधारे विभागाच्या १३ लघु प्रकल्पांनी तळ गाठला आहे. टंचाई निवारणासाठी ६२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. तर पाण्याचे स्त्रोत नसणाऱ्या १९ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. प्रकल्पामध्ये केवळ २३ टक्के जलसाठा आहे. यामुळे भूजलाच्या पातळीत घट नोंदविण्यात आली आहे.जिल्ह्यातील २०४० गावापैकी ७५५ गावांमध्ये पाणीटंचाई आहे. जिल्हा प्रशासनाने साडेचार कोटी रूपयांचा पाणीटंचाई कृती आराखडा मंजूर केला आहे. या माध्यमातून विहीर अधिग्रहण, खोलीकरण, गाळ काढणे, झिरी घेणे, नळ योजनेची विशेष दुरूस्ती करणे, नवीन सिंचन विहिरी घेणे, हातपंप दुरूस्त करणे, विद्युत पंप लावणे ही कामे जिल्हा परिषदेने प्रस्तावित केली आहे.मेच्या पहिल्या आठवड्यात ८१ गावांमधील भीषण पाणीटंचाई निवारण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये ६२ गावात विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या. यामध्ये वणी ९, दारव्हा ८, पुसद ९, नेर १०, यवतमाळ १४, बाभूळगाव २ तर आर्णीमध्ये १० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले.१९ गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये बाभूळगाव २, पुसद ७, नेर ३, आर्णी १, महागाव १ आणि यवतमाळ तालुक्यात ३ टँकरच्या मदतीने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. इतर ठिकाणावरून मागणी येताच पाहणी करून तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील २१३ पाझर तलाव कोरडे पडले आहेत. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.यवतमाळ शहरात कृत्रिम पाणीटंचाईजिल्ह्यात भीषण टंचाई असताना जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या यवतमाळ शहरातही टंचाई भेडसावत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाºया निळोणा प्रकल्पात २८ आणि चापडोह प्रकल्पात ५५ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी मृतसाठाही संपला होता. गतवर्षीच्या तुलनेत मुबलक पाणी असूनही प्राधिकरणाचे वेळापत्रक सतत कोलमडत आहे. यामुळे नागरिकांना पाणीटंचाई सहन करावी लागत आहे.जिल्ह्याची भिस्त केवळ २३ टक्के जलसाठ्यावरजिल्ह्याच्या मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पात २३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. पूस २७.५०, अरूणावती १४.२० , बेंबळा ३३.७३, तर अडाण १४.१, नवरगाव ३७.७४, गोकी २४.१२, वाघाडी २२.१०, सायखेडा २२.४८, अधरपूस २४.५० तर बोरगाव प्रकल्पात १२.१५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. याच मोजक्या जलसाठ्यावर जिल्ह्यातील ग्रामीण भागाची भिस्त आहे.पाटबंधारेचे १३ तलाव कोरडेपाटबंधारे विभागच्या अखत्यारीतील ६३ प्रकल्पांपैकी १३ लघु प्रकल्प कोरडे पडले आहे. यामध्ये उमर्डा, हातोला, लोहतवाडी, नेर, देवगाव, रुई, इटाळा, किन्ही, पहूर (ई), म्हैसदोडका, बोर्डा, तरोडा, पोफाळी या प्रकल्पांचा समावेश आहे. उर्वरित ५० प्रकल्पांमध्येही केवळ १५ टक्के पाणी शिल्लक आहे.
२१३ जलाशयांमध्ये थेंबही उरला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 9:38 PM
जिल्ह्यातील पाणीटंचाईची स्थिती गंभीर आहे. जिल्हा परिषदेची २१३ जलाशये कोरडी पडली आहेत. तर पाटबंधारे विभागाच्या १३ लघु प्रकल्पांनी तळ गाठला आहे. टंचाई निवारणासाठी ६२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. तर पाण्याचे स्त्रोत नसणाऱ्या १९ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
ठळक मुद्देसंडे अँकर । ७५५ गावांमध्ये पाणीटंचाई, ६२ विहिरींचे अधिग्रहण, १९ टँकरने पाणीपुरवठा