गजानन अक्कलवार ।ऑनलाईन लोकमत कळंब : राष्ट्रवादी काँग्रेस विदर्भात वाढविण्यासाठी फार कष्ट घेतले नाही, याची खंत आहे. मात्र आता ही पोकळी आम्ही भरून काढू, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काढण्यात आलेली हल्लाबोल पदयात्रा शनिवारी येथे दाखल झाली. यावेळी त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बातचित केली.यावेळी त्यांनी विविध विषयांना हात घातला. भाजपाला राष्ट्रवादीचा छुपा पाठींबा असल्याची शंका वारंवार घेतली जाते. परंतु, या सरकारविरूद्ध राष्टÑवादीनेच वारंवार आवाज उठविला. सरकारच्या धोरणांवर अनेकदा टिका केली. शिवसेना वेळेवर शेपूट घालणारा पक्ष आहे. सरकारमध्ये राहून सरकारविरूद्ध भूमिका घेताना आम्ही कधी पाहीले नाही. सरकारमधून बाहेर पडण्याची हिंमत शिवसेनेत नाही, असा त्यानी खासदार सुळे यांनी केला.या शासनाने गरिबांची थट्टा चालविली आहे. कर्जमाफीवरून शेतकºयांना जेरीस आणले जात आहे. कीटकनाशकांच्या फवारणीतून झालेल्या विषबाधाप्रकरणी शासन संवेदनाशून्य आहे. मुख्यमंत्री यवतमाळात लपून येतात व कोणाशीही न बोलता निघून जातात. यावरून या शासनाची असंवेदनशिलता अधोरेखित होते. आता झोपेचे सोंग घेतलेल्या शासनाला जागे करण्यासाठी हल्लाबोल आंदोलन सुरु करण्यात आले, असे त्यांनी स्पष्ट केले. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या. फवारणीतून विषबाधा झाल्याने अनेक शेतकरी मृत्युमुखी पडले. त्यामुळे हे आंदोलन यवतमाळातून सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.विषबाधेतून मृत्युमुखी पडलेल्यांना दोन लाखांचा धनादेश देऊन सरकारने आपली जबाबदारी झटकली. परंतु राष्टÑवादी मात्र आधार देण्याचे काम करणार आहे. काल एका कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी घेण्याची भूमिका पक्षाने घेतली. सरकारनेही इतर कुटुंबांची जबाबदारी घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यवतमाळमधये कृषि विभागात ५०% जागा रिक्त आहे. याला कोण जबाबदार आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी सर्व शेतकºयांना सुरक्षा कोट देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ते पूर्ण केले नाही. त्यामुळे या सरकराच्या थापांना यापुढे बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले.शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेचा समाचारशिवसेना अथवा त्यांच्या मंत्र्यांनी केलेली पाच चांगली कामे सांगावी, असे आव्हान सुप्रिया सुळे यांनी दिले. महाराष्टÑाच्या उभारणीत शिवसेनेचे योगदान काय ?, असा सवाल करीत त्यांनी शिवसेनेच्या दुट्टप्पी भूमिकेचा चांगलाच समाचार घेतला.केंद्र व राज्य सरकार आश्वासन विसरलेमागील तीन वर्षात केंद्र व राज्य सरकारने एकही आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सरकारला जागे करण्यासाठी हल्लाबोल पदयात्रा सुरू करण्यात आल्याचे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
राष्ट्रवादी वाढविण्यासाठी विदर्भात प्रयत्न झाले नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 11:24 PM
राष्ट्रवादी काँग्रेस विदर्भात वाढविण्यासाठी फार कष्ट घेतले नाही, याची खंत आहे. मात्र आता ही पोकळी आम्ही भरून काढू, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
ठळक मुद्देसुप्रिया सुळे यांची खंत : पोकळी भरून काढणार