लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपरिषदेच्या नियोजन शुन्य कारभारमुळे संपूर्ण शहराची वाताहत होत आहे. दरवर्षी प्रमाणे आता धो-धो पाऊस कोसळत असताना मुरूम टाकण्याच्या कंत्राटाचे नियोजन केले जात आहे. दरवर्षी पाऊस गेल्यानंतर मुरूम टाकल्याची देयके काढली जातात. यंदासुध्दा यवतमाळकरांना चिखल तुडवावा लागणार आहे.नगरपषिदेतील २८ प्रभागामध्ये दरवर्षी कमी अधिक प्रमाणात मुरूम टाकावा लागतो. त्या शिवाय रस्त्यवरून चालणेही कठीण होते. हे दरवर्षीचे काम आहे. मात्र याचे नियोजन कधीच वेळेत केले जात नाही. कंत्राटदाराला मुरूमाचे कंत्राट दिल्यानंतर निश्चित कंत्राटाच्या २० टक्केही मुरूम टाकावा लागत नाही. अशीच व्युहरचना आखली जाते. पाऊस पडून चिखल झाल्यनंतर पालिका प्रशासनाला मुरूम टाकण्याचे कार्यादेश देण्याची जाग येते. आताही निविदा प्रक्रिया करून त्या उघडण्यात आल्या आहेत. त्यातील कमी दराची निविदा निवडून संबधित कंत्राटदाराला कार्यादेश देणे बाकी आहे. मात्र त्यासाठीसुध्दा किती कालावधी लागतो, हे सांगता येत नाही.शहरात गेल्या तीन दिवसापासून धो-धो पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक प्रभागातील रस्त्यावर चिखल झाला आहे. नव्याने वाढीव क्षेत्रातील काही भागांची स्थिती अतिशय गंभीर आहे. रस्त्यावरून पायदळही चालता येत नाही. नागरिकांना प्रचंड कसरत करावी लागत आहे. मात्र नागरिकांच्या त्रासाची पालिकेत कोणालाच जाणीव नाही. त्याचे काम हे सोयीनेच केले जाते. अजून पर्यंत मुरूमाचे कंत्राट कोणाला देणार हेच निश्चित झाले नाही. त्यामुळे पाऊस गेल्यानंतर व रस्त्यावरचा चिखल सुकल्यावरच तेथे मुरूम टाकला जाणार आहे. मुरूम टाकतांनाही कोणेतेच निकष पाळले जात नाही. कंत्राटादार पाऊस लांबल्यास खदानीमध्ये ट्रक जात नाही, तेथे चिखल असल्याने मुरूम आणता येत नाही, अशी सबब पुढे करून वेळ मारून नेतो. एकदा का पाऊस निघून गेला की मग मुरूम हा कागदोपत्रीच टाकला जातो. देयके पूर्ण निघतात. यात वाटेकरी असल्याने कोणतीच उलट तपासणी होत नाही. हा आजवरचा अनुभव आहे.मुरम नव्हे, चक्क दगडमुरूमाच्या नावे कंत्राटदार चक्क दगड टाकतात. त्यामुळे चिखल पूरला पण दगड नको, अशी अवस्था होते. कंत्राट देतांना मुरूम गड्डयामध्ये टाकून व्यवस्थित पसरवणे असे नमूद असते. मात्र आज पर्यंत कधीच मुरूम पसरविण्यात आला नाही. अक्षरश: मुरूमाचे ढीग रस्त्यावर टाकले जातात. यामुळे अपघातही होते. वाहने क्षतीग्रस्त होतात.
यवतमाळातील रस्त्यांच्या खड्ड्यांसाठी मुरूमच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 5:00 AM
नागरिकांच्या त्रासाची पालिकेत कोणालाच जाणीव नाही. त्याचे काम हे सोयीनेच केले जाते. अजून पर्यंत मुरूमाचे कंत्राट कोणाला देणार हेच निश्चित झाले नाही. त्यामुळे पाऊस गेल्यानंतर व रस्त्यावरचा चिखल सुकल्यावरच तेथे मुरूम टाकला जाणार आहे. मुरूम टाकतांनाही कोणेतेच निकष पाळले जात नाही. कंत्राटादार पाऊस लांबल्यास खदानीमध्ये ट्रक जात नाही, तेथे चिखल असल्याने मुरूम आणता येत नाही, अशी सबब पुढे करून वेळ मारून नेतो.
ठळक मुद्देनगरपरिषदेच्या नियोजनाचा अभाव : पाऊस गेल्यानंतर टाकणार