शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
3
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
4
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
5
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
6
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
7
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
8
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
9
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
10
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
11
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
12
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
13
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
14
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
15
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
16
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
17
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
18
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
19
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
20
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का

२०४७ गावांमध्ये टंचाई जाहीर

By admin | Published: July 03, 2014 11:48 PM

जिल्ह्यात मागील वर्षातील खरीप हंगामात खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैसे किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या गावांना टंचाई परिस्थितीतील गावे म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामध्ये दोन हजार ४७ गावांचा

यवतमाळ : जिल्ह्यात मागील वर्षातील खरीप हंगामात खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैसे किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या गावांना टंचाई परिस्थितीतील गावे म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामध्ये दोन हजार ४७ गावांचा समावेश आहे. टंचाई घोषित झालेल्या गावांमध्ये शासनाच्यावतीने विविध प्रकारच्या सवलती देण्यात येणार असून तसे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहे.गेल्या वर्षी जिल्ह्यासाठी खरीप हंगाम निराशाजनक गेला. बहुतांश शेतकऱ्यांना चांगल्या शेतीमालाची अपेक्षा असताना उत्पादनात घट आली. त्यामुळे या हंगामात जिल्ह्याची पैसेवारीही घसरली. जिल्ह्यातील ज्या गावांची गेल्या वर्षीच्या खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैसे किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा गावांना टंचाई परिस्थितीतील गावे म्हणून घोषित करण्यात आले आहे. टंचाई घोषित गावांमध्ये यवतमाळ तालुक्यातील १३६ गावांचा समावेश आहे. कळंब तालुक्यातील १४०, बाभूळगाव १२७, आर्णी १०६, दारव्हा १४६, दिग्रस ८१, नेर १२१, पुसद १८८, उमरखेड १३६, महागाव ११४, केळापूर १३१, घाटंजी १०७, राळेगाव १३२, वणी १५७, मारेगाव १०८ आणि झरीजामणी तालुक्यातील ११७ गावांचा समावेश आहे. टंचाई घोषित गावांमध्ये आठ प्रकारच्या अतिरिक्त सुविधा नव्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामध्ये जमिनी महसुलात सूट, सहकारी कर्जाचे रूपांतरण, शेतीच्या निगडीत कर्जाच्या वसुलीत स्थगिती, वीज बिलात ३३ टक्के सूट, परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेंतर्गत घेण्यात येणाऱ्या कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर, टंचाईग्रस्त गावात शेतीपंपाची वीज जोडणी खंडित करण्यात येणार नाही आदी बाबींचा समावेश असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)