सूफी भीमगीते : विनया-विजया जाधव यांच्या गीतांनी श्रोेते मंत्रमुग्ध पुसद : ‘आली...आली...आली भीमजयंती आली’, ‘किती आले, आले किती सारे, न झाले कुणी भीमावाणी’ यासारख्या एकाहून एक सुमधूर सूफी भीमगीतांचा अनुभव यशवंत रंगमंदिराच्या प्रांगणात उपस्थित हजारो रसिकांनी घेतला. निमित्त होते धम्मक्रांती प्रज्ञापर्वातील विनया व विजया जाधव या भगिनींच्या सूफी भीमगीतांच्या मैफलीचे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित धम्मक्रांती प्रज्ञापर्वात मंगळवारी ‘दुनिया मे भीमजी महान’ हा भीमगीतांचा अनोखा नजराना पुसदकरांसाठी पेश करण्यात आला. प्रख्यात सूफी व शास्त्रीय संगीत क्षेत्रात नावारूपास आलेल्या जाधव भगिनींनी सूफी व शास्त्रीय संगीताचा मिलाफ सादर केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अनिताताई नाईक होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.छाया हंबर्डे, समाजकल्याण निरीक्षक मीनाक्षी मोटघरे, माधुरी आसेगावकर, प्रज्ञापर्वाचे अध्यक्ष मिलिंद हट्टेकर उपस्थित होते. एकापेक्षा एक सरस भीमगीतांनी पुसदकर अक्षरश: चिंब झाले. जाधव भगिनींच्या भीमगीतांना श्रोते भरभरून दाद देत होते. संचालन प्रीती भरणे यांनी केले. यशस्वीतेसाठी महेश खडसे, शीतलकुमार वानखेडे, प्रा.विलास भवरे, गवारगुरू, विठ्ठलराव खडसे, साहेबराव गुजर, मनोज खिराडे, शशांक भरणे, सुभाष गायकवाड, समाधान केवटे, सुरेश कांबळे, कैलास राऊत, प्रफुल्ल भालेराव, संजय वाढवे, संदीप दिघाडे, गजानन लोखंडे, माधव हाटे, डॉ.पंजाबराव खंदारे, शरद ढेंबरे, बुद्धघोष ढगे, रवी खरात, विनोद मनवर, प्रशांत धुळे, भाऊ अघमे, भाऊ जांभुळकर, गणेश वाढोरे, अशोक वाहुळे यांनी पुढाकार घेतला. गुरुवार, १३ एप्रिल रोजी यशवंत रंगमंदिरात कव्वाल खलील शैदा यांचा ‘सुनोजी हम जय भीमवाले है’ हा बुद्धगीतांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. (प्रतिनिधी)
आली...आली भीमजयंती आली
By admin | Published: April 13, 2017 1:14 AM