पोलीस भरतीकडे अनेक जण चांगल्या रोजगाराची संधी म्हणूनच बघतात. पण अनेकांना देशसेवेची महत्त्वाकांक्षा या क्षेत्राकडे खेचून आणते. पण सेवेची ही संधीही सहजसुलभ नाही. लवकरच होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी यवतमाळात दाखल झालेल्या तरुणांनी जबरदस्त शारीरिक कसरत चालविली आहे. पहाटेपासूनच त्यांच्या धावण्याचा सराव सुरू होतो. पोलीस भरतीत विविध पातळीवर उमेदवारांची कसोटी पाहिली जाते. पण सराव करणाऱ्यांना डर कसला? बौद्धिक गुणवत्ता सिद्ध केल्यावर घाम गाळून पोलीस दलात दाखल होऊच, हा आत्मविश्वास बलदंड होत आहे.
डर के आगे जीत हैं
By admin | Published: December 23, 2015 3:10 AM