ऑनलाईन लोकमतयवतमाळ : पंचायत राज समितीकडून ग्रामसेवकांवर अन्याय होणार नाही, असे आश्वासन पंचायत राज कमेटीचे अध्यक्ष सुधीर पारवे यांनी ग्रामसेवक संघाच्या शिष्टमंडळाला दिले. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाचे अधिवेशन नागपूर येथे घेण्यात आले. यावेळी संघाच्या यवतमाळ जिल्हा पदाधिकाऱ्यांनी ना. सुधीर पारवे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.यवतमाळ जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या आॅडीट आक्षेपाबाबतची समस्या ना. पारवे यांच्या लक्षात आणून दिली. झालेल्या कामाचे प्राकलन, मूल्यांकन, कंप्लीकेशन प्रमाणपत्र उपलब्ध झाले आहे. मात्र रॉयल्टीची रक्कम, पुरवठादाराने इन्कमटॅक्स भरल्याबाबतचे पुरावे सादर केले नाही. त्यामुळे सदर दोन टक्के रक्कम व शासन उपकराकरिता झालेल्या कामाची संपूर्ण रक्कम आक्षेपित ठेवली आहे. ही रक्कम मोठी दिसत असल्याने जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीची बदनामी होत आहे. त्यामुळे सदर आक्षेप वगळण्याचे अधिकार मूल्यांकन आणि सीसी असल्यास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात यावे. असे झाल्यास मोठ्या प्रमाणात आक्षेप कमी होऊ शकतात हे संघाचे अध्यक्ष सुभाष भोयर यांनी लक्षात आणून दिले. यावर पर्याय काढला जाईल असे सांगतानाच यवतमाळ जिल्ह्यात पीआरसी आल्यास कोणत्याही ग्रामसेवकावर अन्याय होणार नाही अशी ग्वाही पारवे यांनी दिली.यावेळी ग्रामसेवक संघाचे जिल्हा सचिव राजेंद्र खरतडे, उपाध्यक्ष ए.एम. हांडे, व्ही.व्ही, ढोरे, कोषाध्यक्ष एन.एस. ठक, संघटक, जी.एस. सुखदे, प्रसिद्धी प्रमुख विनोद मोरे, विभागीय अध्यक्ष श्यामसुंदर हजारे, जिल्हा विभागीय अध्यक्ष आर.एस. दुधे, नरेंद्र शेळके, कोरके, कदम, मंचलवार, तालुकाध्यक्ष रतन अग्रहरी, इंगोले, तालुका सचिव सुधीर क्षीरसागर, श्रीकांत बन्सोड, प्रभूूदास भगत, गजभिये, करडे, गजानन टाके आदी उपस्थित होते. त्यांनी अधिवेशनातही सहभाग नोंदविला.
ग्रामसेवकांवर अन्याय होणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 11:58 PM
पंचायत राज समितीकडून ग्रामसेवकांवर अन्याय होणार नाही, असे आश्वासन पंचायत राज कमेटीचे अध्यक्ष सुधीर पारवे यांनी ग्रामसेवक संघाच्या शिष्टमंडळाला दिले.
ठळक मुद्देसुधीर पारवे : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाच्या शिष्टमंडळाशी विविध विषयांवर चर्चा