शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायली नागरिक अचानक भारत सोडून जाऊ लागले; पर्यटनाचे बुकिंग रद्द, विमाने फुल
2
"एकनाथ शिंदे दावोसमध्ये हॉटेलचं बिल न देताच..." जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
3
'सुप्रिया सुळेंना फुकटचं खायची सवय, १५०० दिले तर पवारांच्या...', भाजप आमदाराची टीका
4
Smart SIP Vs Regular SIP : स्मार्ट आणि रेग्युलर SIP मध्ये फरक काय, ५००० रुपयांतून २३ लाखांची होईल अधिक कमाई; कशी?
5
"सिंचन घोटाळा झाल्याचं पंतप्रधान मोदींनीच कबूल केलं"; पृथ्वीराज चव्हाणांनी अजित पवारांना पुन्हा डिवचलं
6
शाळेतून परतणाऱ्या मुलींची छेड काढणाऱ्यांचा 'हाफ एन्काऊंटर'; आरोपींचा पोलिसांवर गोळीबार
7
Suraj Chavan : १४ लाख अन् १० लाखांचा व्हाऊचर आणि..., बिग बॉस जिंकल्यानंतर सूरज चव्हाणला किती रुपये मिळाले?
8
'तो जिंकला अन् १ तासात गाणं तयार केलं', उत्कर्ष शिंदेने बनवलेलं सूरज चव्हाणवरचं धमाकेदार गाणं ऐकाच
9
अमेरिकेच्या अ‍ॅडवायझरीनंतर कराची विमानतळाबाहेर बॉम्बस्फोट; दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू
10
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
11
ओलाच्या सर्व्हिसवरून कुणाल कामरा-भाविश अग्रवाल भिडले; लोकांनी मालकाला आरसा दाखविला...
12
"शिवसेना वाढण्यासाठी हजारो शिवसैनिकांच्या हत्या"; रामदास कदमांचे वक्तव्य, म्हणाले "उद्धव ठाकरेंना याची..."
13
आजचे राशीभविष्य ७ ऑक्टोबर २०२४; धनलाभ होईल, येणारी बातमी...
14
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
15
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत
16
“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
17
“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे
18
मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
20
चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू

पाण्याकरिता ‘ते’ पुढे सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 10:26 PM

पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी संघर्ष सुरू असल्याचे चित्र पहायला मिळते. तर दुसरीकडे व्याकूळ नागरिकांची तहान भागविण्याकरिता काही संघटना, शिकवणी वर्गाचे शिक्षक आणि काही व्यक्तींनी पाण्याचे टँकर सुरू केले आहे.

ठळक मुद्देआईच्या तेरवीचा खर्च टाळून सुरू केला टँकर‘आयएमए’ सरकारी दवाखान्यात पुरविते पाणीशिकवणी वर्ग शिक्षकाने सुरू केली जलसेवा

रुपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी संघर्ष सुरू असल्याचे चित्र पहायला मिळते. तर दुसरीकडे व्याकूळ नागरिकांची तहान भागविण्याकरिता काही संघटना, शिकवणी वर्गाचे शिक्षक आणि काही व्यक्तींनी पाण्याचे टँकर सुरू केले आहे.यवतमाळ शहरातील पाणीटंचाई निवारण्यासाठी नगरपरिषद, शिवसेना आणि विविध पक्षांचे टँकर सुरू आहेत. हे टँकर अपुरे पडत आहेत. यामुळे काही व्यक्ती पुढे आल्या आहेत. सामाजिक दायित्व म्हणून त्या काम करीत आहेत.पेशवे प्लॉटमध्ये असणारे बाळासाहेब नखाते यांच्या मातोश्रींचे निधन झाले. त्यांनी त्यांच्या तेरवीचा खर्च वाचवून पाणी वाटण्याचा निर्णय घेतला. यातून पुष्पाताईच्या स्मरणार्थ पाणी टँकर वितरित केले जात आहे. जय गुरूदेव सेवा संघाचे लोक या पाणी वितरणात मोलाची भूमिका पार पाडत आहेत. यातून मानसिक समाधान मिळाल्याचे नखाते म्हणतात.शिंदे प्लॉटमध्ये वास्तव्याला असणारे अरसोड कोचिंग क्लासचे संचालक योगेश अरसोड यांनी सामाजिक ऋण फेडण्यासाठी पाण्याचे टँकर वितरित करण्याचा निर्णय घेतला. ही जलसेवा त्यांनी सुरू केली आहे. शहरातील टंचाई भागात ते मोफत पाणी वितरित करीत आहेत. अजय किन्हीकर त्यांना या कामात मोलाची मदत करीत आहेत.वैद्यकीय महाविद्यालयासाठी आयएमएचे पाणीवैद्यकीय महाविद्यालयात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. यातून भरती विभाग आणि आॅपरेशन थिएटर बंद करण्याची स्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील पाण्याची टंचाई पाहता आयएमएने पाणी वितरणाचा निर्णय घेतला. आयएमएचे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन बोरा आणि सचिव डॉ. स्वप्निल मानकर यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठातांशी संपर्क केला. त्यांनी पाण्याची अडचण जाणून घेतली. वैद्यकीय महाविद्यालयात दरदिवसाला किमान एक लाख लिटर पाण्याची गरज आहे. वैद्यकीय महाविद्यालाजवळ २५ हजार लिटर पाण्याची क्षमता आहे. आता आयएमएने २४ हजार लिटर पाण्याची व्यवस्था केली आहे. यामुळे पाणी पुरवठ्याचा निम्मा प्रश्न निकाली निघण्यास मदत झाली. यासाठी डॉक्टरांनी स्वनिधी गोळा केला आहे.मथुरानगरात पक्ष्यांकरिता पाणवठामाणसांना पाण्यासाठी मारामार सहन करावी लागत आहे. अशा स्थितीत पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची काळजी बोटावर मोजता यईल अशाच लोकांना आहे. यवतमाळ शहरातील शिक्षक नरेश उन्हाळे यांनी यातून हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई