शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
2
१२ दिवसांत हिजबुल्लाहचा गेम फिनिश..पेजर हल्ला ते बंकर स्फोटापर्यंत इस्त्रायलचा तांडव
3
ठरलं! मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणार; म्हणाले, “१२ वाजता या, एकजूट अन् शक्ती दाखवा”
4
विधानसभेआधी धारावीकरांसाठी सरकारची मोठी भेट; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ३८ निर्णय
5
३०० विकेट्स अन् ३००० धावांच्या कॉम्बोसह जड्डूच्या नावे झाला जम्बो रेकॉर्ड
6
सीबीआयचे पुण्यासह देशात ३२ ठिकाणी छापे; तीन शहरातील २६ म्होरक्यांना अटक
7
फायद्याची गोष्ट! आधार कार्ड करता येऊ शकतं लॉक; जाणून घ्या, कसं काम करतं हे भन्नाट फीचर
8
रोहित पवारांनी CM शिंदेंना दाखवला जुना व्हिडीओ; "माझी चेष्टा केली तोवर ठीक होते पण..."
9
भाजपाची बंडखोरांवर कारवाई! माजी मंत्र्यासह 'या' नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
10
बारामतीच्या महाविद्यालयात विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करत खून, दुचाकीला कट मारल्याचा 'बदला'
11
सलग २४ व्या दिवशी अपर सर्किट, ₹३३ चा 'हा' शेअर ₹२६०० पार; कोणी शेअर विकणारंच नाही
12
“शिंदेंनी सूरत, गुवाहाटी किंवा कामाख्या मंदिरासमोर दसरा मेळावा घ्यावा”; संजय राऊतांचा टोला
13
बांगलादेशचा डाव २३३ धावांत आटोपला; टीम इंडियाकडे 'वनडे स्टाईल'मध्ये कसोटी जिंकण्याची संधी
14
Share Market Live Update : शेअर बाजारात हाहाकार, Sensex १००० अंकांपेक्षा अधिक आपटला; २७९ कंपन्यांच्या शेअर्सना लोअर सर्किट
15
500 च्या नोटेवर अनुपम खेर यांचा फोटो, खुद्द अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ
16
तुम्ही लढत बसाल, वकील खुश होतील; घटस्फोटाच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीश काय बोलले?
17
"आपण आपल्या प्रकृतीच्या बाबतीत PM मोदींना विनाकारण ओढलं, प्रार्थना करतो की...'; शाह यांचा खर्गेंवर पलटवार
18
नसरल्लाहच्या मृत्यूचे पडसाद भारतात उमटले; लखनौला शेकडो लोक रस्त्यावर उतरले
19
Maharashtra Elections: अजित पवारांचा पहिला उमेदवार ठरला! फोनवरून नावाची केली घोषणा
20
अखेर Ashneer Grover यांनी BharatPe सोबतचा वाद सोडवला, काय झाली दोघांमध्ये डील?

मध्यरात्री सोयाबीनची चोरी, पोते दुचाकीवर टाकून निघणार तेवढ्यात मालकाला जाग आली अन्..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2022 2:45 PM

चोरटे सोयाबीनचे पोते चोरून दुचाकीवरून पळत असताना अचानक घरमालकाला जाग आली व सदर प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केल्याने चोरट्यांना पळताच आले नाही.

यवतमाळ : गेल्या काही दिवसांपासून परिसरात सोयाबीन चोरीच्या (soyabean theft) घटना वाढल्या आहेत. घराशेजारील साठवून ठेवलेले सोयाबीनचे पोते मोटारसायकलवरून लंपास करण्याचा प्रकार सुरू असताना अचानक घरमालकाला जाग आली व चोरटे सापडले. त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने या दोन्ही चोरट्यांना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना मारेगाव तालुक्यातील हिवरा-मजरा येथे घडली.

तालुक्यातील वेगाव, सराटी, नांदेपेरा येथील कापूस, सोयाबीन चोरीतील आरोपी पोलिसांच्या हाती लागले नसतानाच पुन्हा हिवरा-मजरा येथे सोयाबीन चोरीचा प्रकार समोर आला आहे. सुमीत मनवर बोधाने रा. हिवरा-मजरा या शेतकऱ्याने या हंगामातील आठ ते दहा क्विंटल सोयाबीन पोते भरून घरासमोरील टीनेच्या शेडमध्ये ठेवले होते.

बुधवारी रात्री गावातीलच दिलीप लहानू रामपुरे व विकास सुखदेव बंदलवार या दोन्ही चोरट्यांनी सोयाबीन चोरायचे ठरवले. त्यांनी रात्री २.५० च्या दरम्यान सोयीबीनचे पोते चोरले व दुचाकीवर (एम. एच. २९-ए. बी. ४२८) टाकून निघाले. इतक्यात फिर्यादीचे वडील मनवर बोधणे हे लघुशंकेसाठी उठले असता, त्यांना हा प्रकार दिसला. त्यांनी चोर-चोर म्हणून जोराने आरडाओरडा केला. त्यांच्या आवाजाने शेजारील नागरिक जागे झाले. या धावपळीत चोरट्यांना पळणे जमले नाही व ते सापडले. नागरिकांनी दोन्ही चोरट्यांना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

पोलिसांनी दोन्ही आरोपीना ताब्यात घेऊन भादंवि कलम ३८०, ४६१ कलमाखाली गुन्हा दाखल केला. यापूर्वी शेतमाल चोरीच्या घटना तालुक्यात घडल्या. त्या घटनांशी या आरोपीचा काही संबंध आहे काय? याचा तपास पोलीस करीत असून पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीagricultureशेतीFarmerशेतकरी