लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एसटी कर्मचाºयांनी पुकारलेल्या संपामुळे गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात दीड हजार बसफेºया रद्द झाल्या. याचा फटका सामान्य प्रवाशांना बसला असून ग्रामीण भागात हाहाकार उडाला आहे. ऐन दिवाळीत बस नसल्याने महिलांना माहेर जाणेही कठीण झाले आहे.विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाºयांनी सोमवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला. बुधवारी या संपावर तोडगा न निघाल्याने दुसºया दिवशीही संप सुरूच होता. यामुळे बस आगारातच अडकून पडल्या. संपाच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यात केवळ १५ फेºया झाल्या. बुधवारी मात्र एकही बस कोणत्याच आगारातून बाहेर पडली नाही. त्यामुळे ऐन दिवाळीत जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकात शुकशुकाट होता. खासगी वाहनांमध्ये मात्र तुफान गर्दी झाली होती.संपामुळे ‘गाव तेथे एसटी’ या ब्रीदवाक्याचा बोजवारा उडाला. प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. बस नसल्याने दिवाळीचा बाजारावर परिणाम झाला. नेकांना खरेदीसाठी जाताच आले नाही. जे नागरिक गावाबाहेर पडले, त्यांना परतणे कठीण झाले. बाहेर गावावरून येणाºया व जाणाºया प्रवाशांचे या संपाने प्रचंड हाल सुरू आहे. जादा पैसे मोजून त्यांना खासगी वाहनाने असुरक्षित प्रवास करावा लागत आहे. यात महिला, वृद्ध आणि मुलांची प्रचंड फरफट होत आहे.हमालांची रोजीरोटी बुडालीसर्व बसस्थानकात दररोज शेकडो हमाल, सफाई कामगार काम करतात. त्यावरच त्यांची रोजीरोटी चालते. मात्र संपामुळे दोन दिवसांपासून हमालांचा रोजगारच बुडाला आहे. दिवाळीच्या तोंडावर त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.पुण्याच्या ५८ बसेस रद्दएसटीने दिवाळीसाठी पुण्यावरून येणाºया प्रवाशांचे खास बुकींग केले. त्यासाठी खास पुण्याहून विदर्भातील प्रवाशांना आणण्यासाठी ५८ बस बुकींग करण्यात आल्या. एकट्या यवतमाळ जिल्ह्यासाठी १२ बसचे बुकींग करण्यात आले होते. संपामुळे या सर्वच फेºया रद्द झाल्याने पुण्याहून येणाºया प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
संपाने दीड हजार बसफेºया रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 11:22 PM
एसटी कर्मचाºयांनी पुकारलेल्या संपामुळे गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात दीड हजार बसफेºया रद्द झाल्या. याचा फटका सामान्य प्रवाशांना बसला असून ग्रामीण भागात हाहाकार उडाला आहे.
ठळक मुद्देग्रामीणमध्ये हाहाकार : एसटीअभावी ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल