शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

Yavatmal: "ज्यांनी पक्ष, चिन्ह चोरले त्यांना चोर नाही तर काय म्हणायचं?" चंद्रकांत खैरे यांचा सवाल

By विशाल सोनटक्के | Published: March 02, 2023 3:42 PM

Chandrakant Khaire: ज्यांनी राजकीय फायद्यासाठी शिवसैनिकांचे वडील, पक्ष, चिन्ह चोरले त्यांना चोर नाही तर काय म्हणायचे, असा सवाल माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी विचारला आहे.

 - विशाल सोनटक्केयवतमाळ : ज्यांनी राजकीय फायद्यासाठी शिवसैनिकांचे वडील, पक्ष, चिन्ह चोरले त्यांना चोर नाही तर काय म्हणायचे, असा प्रश्न करीत संजय राऊत हे विधिमंडळाला चोर म्हणाले नाहीत, तर विधिमंडळातील चोरांबद्दल ते बोलल्याचे सांगत शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याची पाठराखण केली. राऊत हे खंबीर नेते आहेत. ते हक्कभंगाला घाबरणार नाहीत, असेही ते म्हणाले.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर आहेत. बुधवारी पक्षातर्फे वणी आणि यवतमाळ येथे शिवगर्जना मेळावा घेण्यात आला. त्यानंतर गुरुवारी दुपारी ते यवतमाळ येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शिंदे गटाचे नेते पालकमंत्री संजय राठोड यांच्यावरही जोरदार टीका केली. राठोड यांची ओळख पैसे घेतल्याशिवाय काम न करणारे नेते, अशी आहे. महसूल राज्यमंत्री असताना एकही काम त्यांनी पैसे घेतल्याशिवाय केले नाही. शिवसैनिकांच्या कामातही ते अपेक्षा ठेवायचे. मी स्वत: त्यांना अनेकदा शिवसैनिकांची कामे तरी पैसे न घेता करीत जा, असे सांगितले होते.

शिवसेनेने संजय राठोड यांना पद, प्रतिष्ठा सगळे दिले. मात्र, तरीही ते खुर्ची सोडून का पळाले. पूजा चव्हाण प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ तावातावाने बोलायच्या. आता भाजपसोबत सलगी केल्यानंतर राठोड पवित्र झाले का, पूजा चव्हाणचे प्रकरण बंद झाले का, असा प्रश्न करीत खासदार भावना गवळी यांनी भाजपचा हात धरला. त्यांनाही इडीने माफ केले का, अशी विचारणा खैरे यांनी केली. शिंदेंच्या गद्दारीमुळे शिवसेनेचे सरकार पडले आहे. याचा जाब येणाऱ्या निवडणुकात जनताच विचारेल, असे सांगत येणाऱ्या काळात महाराष्ट्रात पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार येईल. त्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे, असे आवाहनही खैरे यांनी केले.

टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना