शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

‘नरेगा’ घोटाळ््याची तक्रार केल्याने पंचायत समिती सभापतींना धमक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 9:41 PM

पाढंरकवडा पंचायत समितीत ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात ५४ कोटींच्या अपहाराची तक्रार केल्याने पंचायत समिती सभापतींना धमकी दिली जात आहे. या घोटाळ््यात अधिकाऱ्यांसह उपसभापती, काही सदस्य सहभागी असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष संतोष बोरेले यांनी शनिवारी येथे पत्रपरिषदेत केला.

ठळक मुद्दे५४ कोटींचा अपहार । पांढरकवडा उपसभापती, सदस्याचा प्रताप, कामात अनियमितता

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पाढंरकवडा पंचायत समितीत ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात ५४ कोटींच्या अपहाराची तक्रार केल्याने पंचायत समिती सभापतींना धमकी दिली जात आहे. या घोटाळ््यात अधिकाऱ्यांसह उपसभापती, काही सदस्य सहभागी असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष संतोष बोरेले यांनी शनिवारी येथे पत्रपरिषदेत केला.पाढंरकवडा पंचायत समितीमध्ये २०१६ ते २०१८ या कालावधीत अनेक अनियमितता करून मनमानी पद्धतीने रोहयोेचा निधी लाटला. प्रशासकीय मंजुरी नसताना कामे केली. गरज नसताना अनेक गावात सिमेंट काँक्रिट नाल्या, सार्वजनिक विहिरी, नादुरूस्त विहिरी यासह अनेक कामांची बनावट कागदपत्रे तयार केली आहे. सरपंचांच्या खोट्या सह्या मारून व्यवहार केला. बीडीओंच्या संगनमताने अपहार झाल्याचा आरोप बोरले यांनी केला. या प्रकरणाची सभापती इंदुताई मिसेवार यांनी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, रोहयो आयुक्त यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांना धमकविण्यात येत आहे. काही गुंड प्रवृत्तीच्या कंत्राटदारांनी सभापती महिलेच्या मुलांना मारहाण केली. या प्रकरणात पोलिसांनी दोघांवर गुन्हे दाखल केले. दरम्यान, चौकशी समितीत जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोहर नाल्हे यांचा समावेश आहे.संगनमताने अधिकारी, पदाधिकारी यांनी मोठा अपहार केला. अडकणार, असे दिसताच त्यांनी आता तक्रारकर्त्यांना धमकाविणे सुरू केले. सभापतींच्या मुलाला सोशल मीडियावरून जिवे मारण्याची धमकी दिली जात आहे. मात्र या प्रकरणात पांढरकवडा ठाणेदार दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप बोरेले यांनी पत्रकार परिषदेत केला.पत्रपरिषदेला सभापती इंदुताई मिसेवार, बाजार समिती सभापती जानुसेठ जीवाणी, मदन जिद्देवार, सांभारेड्डी येल्टीवार, दीपकअण्णा कापर्तीवार, राजू बोरेले, नीलेश ठाकरे, मस्जीद भाई, विलास गोडे आदी उपस्थित होते.सोशल व स्पेशल आॅडिटची मागणीरोहयोच्या कामाचे सोशल व स्पेशल आॅडीटची मागणी केली आहे. कामांच्या आराखड्याची तपासणी व्हावी, यासाठी निवेदन दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशावरून उपविभागीय अधिकारी एस. भुवनेश्वरी यांच्या अध्यक्षतेत चौकशी समिती नेमण्यात आली आहे. पहिल्यांदाच पंचायत समितीतील रेकॉर्ड सिल झाले आहे. यात उपसभापतीच्या कक्षातील कपाटाचा समावेश आहे.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समिती