पुसद : येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाला तीन नवीन रुग्णवाहिका व एक फिरते लसीकरण वाहन उपलब्ध झाले. त्याचे लोकार्पण आमदार इंद्रनील मनोहरराव नाईक यांच्या हस्ते झाले.
ऊर्जा विभागांतर्गत सीएसआर निधीमधून एक फिरते लसीकरण वाहन व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती यांच्या निधीतून तीन ॲम्ब्युलन्स जिल्हा परिषदेच्या मिशन कायाकल्प या नावीन्यपूर्ण उपक्रमातून उपलब्ध झाल्या आहेत. आमदार इंद्रनील नाईक यांच्या प्रयत्नातून पूर्वीच्या तीन व आताच्या तीन, अशा सहा ॲम्ब्युलन्स मिळाल्याने तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राला लाभ होणार आहे.
आपत्कालीन आरोग्य सेवा, प्रसूतीपूर्व व पश्चात सेवा, अपघात व इतरही रुग्णांसाठी रुग्णवाहिकांची उपलब्धता झाल्याने ग्रामीण भागातील जनतेस आरोग्य सेवेचा लाभ मिळणार आहे. लोकार्पणप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जय नाईक, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनेश चव्हाण, डॉ. शरद ताटेवार, डॉ. गणेश काळे, आरोग्य विस्तार अधिकारी इम्रानुद्दीन सय्यद, जी. झेड. राठोड, आरोग्य सहायक जी.पी. जाधव, शेख आयुब, शेख बाबू, अमोल भगत व कर्मचारी उपस्थित होते.