यवतमाळ : बसमध्ये चढत असताना चाेरट्यांनी पर्समध्ये ठेवलेल्या साेन्याच्या दागिन्यांसह राेख रक्कम असा एकूण ३ लाख ४८ हजार ७७९ हजारांच्या मुद्देमालावर हात साफ केला. चाेरीच्या दोन घटना एकाच दिवशी यवतमाळच्या बसस्थानकात घडल्याने खळबळ उडाली आहे. एक घटना २९ एप्रिल राेजी घडली आहे. उन्हाळ्यात बसमध्ये प्रवाशांची गर्दी राहत असल्याने महिला चाेरट्यांच्या टाेळीकडून या गर्दीचा फायदा घेतला जातो. या चाेरट्यांना अटक करण्यात पाेलिसांना अद्याप यश आलेले नाही.
विनाेद काळे (५९, रा. सिद्धेश्वरनगर) हे बसमध्ये चढत असताना चाेरट्यांनी हातचलाखीने लेदरच्या बॅगमध्ये ठेवलेले आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, एटीएम कार्ड, १५ हजार रुपये किमतीची तीन साेन्याची नाणी, ओमचे लाॅकेट, राेख २६००, असा एकूण २२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना शुक्रवारी घडली. दुसऱ्या घटनेत महिलेच्या पर्समधून २ लाख ७२ हजार २७९ रुपये किमतीचे साेन्याचे दागिने लंपास केले. ही घटना २९ एप्रिल राेजी घडली. महिला बसने पांगरी गावी पाेहोचल्यावर चाेरीचा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी मीनाबाई अशाेक मांजरे (५६, रा पांगरी, आर्णी) या महिलेने शुक्रवारी अवधूतवाडी पाेलिस ठाण्यात तक्रार दिली. सदर महिला आर्णी-जवळा बसमध्ये चढत असताना चाेरट्यांनी पर्समध्ये ठेवलेले दागिने हाताेहात लंपास केले. यात दाेन लाख सहा हजार ४०९ रुपये किमतीच्या ४२ ग्रॅम साेन्याची पाेत, दाेन ग्रॅम छाेटे मंगळसूत्र, सात ग्रॅम साेन्याचे टाॅप्स अशा दागिन्यांचा समावेश आहे. आशाताई माणिकराव गलाट (५३, रा. मुंगसाजीनगर, जांब राेड) या बसमध्ये चढत असताना चाेरट्याने पर्समधील १८ हजार रुपये किमतीची पाच ग्रॅम अंगठी, १५ हजारांची पुणेरी नथ, २० हजारांची चार ग्रॅम गळ्यातील चेन व राेख रक्कम असा ५३ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. दाेन महिला व एका पुरुषाने अवधूतवाडी पाेलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून अनाेळखी चाेरट्यांविरुद्ध गुन्हा नाेंदविण्यात आला. चाेरी राेखण्यात अपयशबसमध्ये चढत असताना चाेरट्यांची टाेळी गर्दीचा फायदा घेत महिलांच्या पर्समधून, तर पुरुषांच्या खिशातून मुद्देमाल लंपास करत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह तगडा पाेलिस बंदाेबस्त ठेवण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. मात्र, अद्यापही चाेरट्यांना अटक करण्यासह चाेरीच्या घटना राेखण्यात यश आल्याचे दिसत नाही