शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

आर्णी वनपरिक्षेत्रात तीन अस्वलांचा हल्ला

By admin | Published: March 30, 2017 12:05 AM

दक्षीण आर्णी वनपरीक्षेत्रामधील कक्ष क्रमांक दोनमध्ये तीन अस्वलांनी एका शेतकऱ्यावर हल्ला केला.

शेतकरी जखमी : वन विभागाकडून मदत सावळीसदोबा : दक्षीण आर्णी वनपरीक्षेत्रामधील कक्ष क्रमांक दोनमध्ये तीन अस्वलांनी एका शेतकऱ्यावर हल्ला केला. यात शेतकरी गंभीर जखमी झाला. सत्तू मारोती आडे (६०), रा. पाळोदी, असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. सत्तू आडे बुधवारी सकाळी शेतात जात होते. गावापासून एक किलोमीटर अंतर गेल्यानंतर दक्षीण आर्णी वनपरीक्षेत्रात येणाऱ्या जंगलात त्यांच्यावर अचानक तीन अस्वलांनी हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना मदत करण्यासाठी जंगलात कुणीही नव्हते. ते जखमी अवस्थेतच सुसाट वेगाने गावाकडे पळत सुटले. गावालगतच्या तलावावर मासोळी पकडणाऱ्या ग्रामस्थांनी त्यांना सावळीसदोबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना यवतमाळच्या शासकीय रूग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. या घटनेची माहिती मिळताच वनपरीक्षेत्र अधिकारी हिंगे, सहायक वनसंरक्षक विपुल राठोड, वनपरीक्षेत्र अधिकारी टी. के. लाकडे यांनी यवतमाळचे शासकीय रूग्णालय गाठून त्यांची विचारपूस केली. त्यांनी वन विभागातर्फे जखमीला रोख १० हजारांची मदत प्रदान केली. (वार्ताहर)