शहरं
Join us  
Trending Stories
1
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
2
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
3
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
4
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
5
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
8
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
9
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
10
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
11
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
12
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
13
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
14
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
16
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
17
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
18
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
19
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल

शाळा सोडून तीन मुलांची अंध वडिलांसह भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 10:27 PM

गरिबांसाठी, दिव्यांगांसाठी, योजना आहेत. शाळाबाह्य मुलांसाठी तर कायदाच आहे. हे सारे असूनही आणि तिन्ही निकषात बसत असूनही तीन निरागस लेकरांवर आणि त्यांच्या पित्यावर भीक मागून जगण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देचुरमुºयातील चुरगळलेली जिंदगी : दु:खाचे साक्षीदार अनेक, साथीदार कोणीच नाही!

अविनाश खंदारे।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : गरिबांसाठी, दिव्यांगांसाठी, योजना आहेत. शाळाबाह्य मुलांसाठी तर कायदाच आहे. हे सारे असूनही आणि तिन्ही निकषात बसत असूनही तीन निरागस लेकरांवर आणि त्यांच्या पित्यावर भीक मागून जगण्याची वेळ आली आहे. उमरखेडमधील सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या संघर्षाचे साक्षीदार झाले, पण दु:खात साथीदार कोणीही झाले नाही. भिक्षा देऊन उपकाराचा आव अनेकांनी आणला. पण शिक्षण देऊन या मुलांना सर्वशिक्षा अभियानाच्या गंगेत आणण्याचा विचारही कुणाच्या मनात आलेला नाही.दहा वर्षांपूर्वी चुरमुरा तांडा येथील एका उमेदीच्या तरुणावर नियतीची कुऱ्हाड कोसळली. विलास फकिरा राठोड हा तरुण रोजमजुरी करत आनंदाने जगत होता. पत्नी संगीताची समर्थ साथ होती. अनिल, राहुल आणि नितीन या तीन मुलांच्या रूपाने त्यांच्या जीवनात आनंद पसरला होता. पण अचानक विलासची दृष्टी गेली. सारथीच अंध झाला म्हटल्यावर पत्नी संगीता पूर्णपणे खचली. लाडक्या लेकरांना आता शिकवायचे कसे? जगवायचे तरी कसे? काहीही झाले तरी पतीची दृष्टी परत आणायचीच हा चंग संगीताने बांधला. गळ्यातले मंगळसूत्र, इतर थोडे दागिने, पाळलेल्या बकऱ्या असे सारे होते नव्हते ते विकून टाकले. विलासला नागपूर, नांदेड, औरंगाबादला नेऊन नेत्रतज्ज्ञांना दाखविले. शस्त्रक्रियाही केली. पण उपयोग झाला नाही. पाच लाखांपेक्षा जास्त खर्च केला. आता घरात काहीच उरले नाही. थकलेल्या संगीताने लोकप्रतिनिधींच्याही भेटी घेतल्या. पण निगरगट्ट लोकांनी साथ दिली नाही. संगीता शेतमजुरी करून अंध पती आणि तीन लेकरांचा उदरनिर्वाह करू लागली. त्यात काय भागणार? अखेर तिन्ही मुलं अंध पित्यासोबत उमरखेडला भिक मागू लागली. गेल्या दहा वर्षांपासून त्यांची जिंदगी अशीच भिक्षेवर सुरू आहे. ही छोटी मुले शाळेत का जात नाही, असा प्रश्न कुणाच्याही मनात येत नाही. फक्त तुम्ही काय रे रोजच मागायला येता म्हणत लोक त्यांच्या अंगावर धावून जातात. मेहनत करूनच जगण्याची सवय असलेल्या माणसाला मागून खाण्याची वेळ येणे यापेक्षा दुर्दैव ते कोणते! तेच शल्य विलासचे मन कुरतडत असते. मोत्यासारखी तीन मुले असताना त्यांना शाळेत पाठवू शकत नाही, ही बोच तर जीवघेणीच. संगीता सध्या उसतोडणीच्या मजुरीला गावोगावी फिरत आहे. ताटातूट झालेल्या या संसाराला सावरण्यासाठी एकही सामाजिक कार्यकर्ता, संस्था सरसावली नाही, हे विशेष.झोपडीचा महाल नको घरकूल द्या!विलास व त्याची पत्नी संगीता तीन मुलांसह १० वर्षांपासून चुरमुरा तांड्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एका झोपडीतच राहतात. पावसाळ्यात या झोपडीत पूर्ण पाणी साचते. राहण्यासाठी जागाच उरत नाही. हे कुटुंब घरकुल मिळावे म्हणून कागदपत्र देऊन शासकीय कार्यालयांमध्ये येरझारा घालत आहे. मात्र वर्षानुवर्षे त्यांच्या हेलपाटाच सुरू आहे. कोणीच त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही.परमेश्वराने तर माझ्यावर अन्याय केलाच; परंतु शासकीय यंत्रणाही दुर्लक्ष करीत आहे. शासनाने दिव्यांगांना ज्या सुविधा दिल्या आहेत, त्याचा कुठलाच लाभ आम्हाला मिळत नाही. माझ्या मुलांना मी पाहू शकत नाही, हे माझे दुर्दैव. लहान मुलाला तर मी जन्मापासून कधीच पाहू शकलो नाही. त्यांना शाळेत पाठवायचे आहे. पण ते शाळेत गेले तर खाणार काय?- विलास राठोड, चुरमुरा तांडा